सुपरस्टार हृतिक रोशन याचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘सुपर 30’चे पहिले पोस्टर आता समोर आले आहे. अभिनेता हृतिक रोशनने आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचे पहिले पोस्टर पोस्ट केले आहे. सुपर 30 हा सिनेमा पाटणा येथील आयआयटी प्रवेश परीक्षांचे कोचिंग क्लास चालवणाऱ्या आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतला आहे. आनंद कुमार यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही या सिनेमाचे पोस्टर पोस्ट केले आहे. ‘अब राजा का बेटा, राजा नहीं बनेगा’ या टॅगलाइनसह हे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर हृतिक रोशनचा लुक नेहमीपेक्षा थोडा हटके दिसतो आहे. गंभीर रूपातला हृतिक या पोस्टरमध्ये आहे. तसेच त्याच्या मागे गणिताचे काही फॉर्म्युलेही दिसत आहेत. तर हृतिक रोशनच्या फोटोखालीच काही मुले बेचकी घेऊन निशाणा साधताना दिसत आहेत.

टीचर्स डेचे औचित्य साधत हृतिक रोशनने या सिनेमाचे पोस्टर पोस्ट केले आहे. गणिताचे शिक्षक असलेल्या आनंद कुमार यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. आता या पहिल्या पोस्टरमुळे सिनेमात काय असणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first look poster of bollywood star hrithik roshans upcoming film super 30was unveiled
First published on: 05-09-2018 at 06:42 IST