अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे अनेक जुने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांत हसत, खेळत, मजा-मस्ती करत कसा राहायचा, हेच या फोटो, व्हिडीओतून दिसून येतंय. सुशांतला कुत्र्यांची फार आवड होती. त्याने चार कुत्रे पाळले होते. त्यात सध्या सोशल मीडियावर त्यातील फज या कुत्र्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. फजसोबतचा सुशांतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो फजसोबत नाचताना पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत सुशांत घरी बसून ‘हिरो नंबर १’ या चित्रपटातील गाणं ऐकत असल्याचं पाहायला मिळतयं. थोड्या वेळानंतर तो उठून फजसोबत नाचू लागतो. त्याला नाचताना पाहून फजसुद्धा आनंदाने उड्या मारताना दिसतोय. फज हा सुशांतचा सर्वात लाडका कुत्रा होता असं म्हटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फज हा लॅब्राडोर जातीचा श्वान असून सुशांतचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. सुशांतने सोशल मीडियावर फजसोबत काही फोटो, व्हिडीओही शेअर केले होते. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर फज एकाकी पडला असून तो उदास असल्याचं बिग बॉस १० चा विजेता मनवीर गुर्जरने म्हटलं होतं. मनवीर गुर्जर याने काही दिवसापूर्वी सुशांत आणि फजच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला होता.