‘टाइमपास’ या मराठी चित्रपटांची सीरिज खूप हिट ठरली. नुकताच या सीरिजचा तिसरा भाग येऊन गेला. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ या चित्रपटामध्ये ऋता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आता ओटीटीवर प्रिमियम होणार आहे. या सिनेमाचे १६ सप्टेंबर रोजी ZEE5 वर प्रीमियम होणार असून पांडू, झोंबिवली, धर्मवीर अशा मराठी चित्रपटांच्या यादीत आणखी भर पडणार आहे.

टाइमपास 3 करताना कोणती आव्हाने आली? ऋता दुर्गुळे म्हणाली “पालवी म्हणून मी…”

टाइमपास फ्रँचाईझीमधल्या तिसऱ्या भागात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. ३६ टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं, हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (ऋता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात, या न्यायाने दगडूचा हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे या सिनेमात दाखवण्यात आलंय.

VIDEO: ‘सीधी बात नो बकवास’, ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारताच उर्वशी रौतेला म्हणाली ‘I am Sorry’

याविषयी अभिनेता प्रथमेश परब म्हणाला, ‘दगडूच्या मित्रांच्या गँगप्रमाणेच कॉलेजमध्ये माझीही गँग होती. फरक इतकाच होता, की दगडू इतरांचे सल्ले ऐकत बसतो आणि प्रत्यक्षात मी स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. टाइमपास 3 चं शूटिंग करताना, दगडूची सिग्नेचर पोझ देताना, त्याचे धमाल पंचलाइन्स, जबरदस्त स्टारकास्ट, शिवाय निसर्गरम्य ठिकाणी रोमँटिक सीन्स करताना मला खूप मजा आली. टाइमपास ३ नं मला कित्येक आठवणी दिल्या आणि त्या कायम लक्षात राहतील.’

Bigg Bossचे घर कुठे आहे? त्याची किंमत किती आणि मालकी कुणाची? जाणून घ्या

टाइमपास ३ मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा कॉलेजच्या अविस्मरणीय दिवसांत घडत असल्यामुळे सगळ्या कलाकारांनीही शूटिंगदरम्यान नॉस्टॅल्जिया अनुभवला.