scorecardresearch

टाइमपास 3 करताना कोणती आव्हाने आली? ऋता दुर्गुळे म्हणाली “पालवी म्हणून मी…”

‘टाइमपास ३’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रिमियर होणार आहे.

टाइमपास 3 करताना कोणती आव्हाने आली? ऋता दुर्गुळे म्हणाली “पालवी म्हणून मी…”
(File Photo)

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ या चित्रपटामध्ये ऋता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आता ओटीटीवर प्रिमियर होणार आहे. या सिनेमाचे १६ सप्टेंबर रोजी ZEE5 वर प्रीमियर होणार असून ‘पांडू’, ‘झोंबिवली’, ‘धर्मवीर’ अशा मराठी चित्रपटांच्या यादीत आणखी भर पडणार आहे.

Bigg Bossचे घर कुठे आहे? त्याची किंमत किती आणि मालकी कुणाची? जाणून घ्या

टाइमपास फ्रँचाईझीमधल्या तिसऱ्या भागात प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. ३६ टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं, हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (ऋता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात, या न्यायाने दगडूचा हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

दगडू-पालवीची लव्ह स्टोरी OTT वर पाहता येणार; प्रथमेश परब म्हणाला, “दगडूची सिग्नेचर पोझ देताना…”

चित्रपटाविषयी ऋता दुर्गुळे म्हणाली, ‘या सिनेमात काम करताना माझ्यासमोर एकच आव्हान होतं आणि ते म्हणजे, भाषेचं. पालवी ज्या टोन किंवा लहेजामध्ये बोलते ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. शूटिंगचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता, विशेषतः पालवी म्हणून मी जेव्हा तयार झाले तो क्षण मी कधीही विसरणार नाही. तो सगळाच अनुभव माझ्यासाठी मजेदार आणि वेगळा होता.’

‘टाइमपास ३’ मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १६ सप्टेंबरपासून तुम्हाला झी-५ वर पाहता येणार आहे.   

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hruta durgule talks about challenges while shooting timepass 3 movie releases on ott zee 5 hrc

ताज्या बातम्या