निदहास चषकाचा रविवारचा अंतिम सामना लक्षवेधी ठरला. जिंकण्याकरता शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता आणि सर्व भारतीयांचे श्वास रोखले गेले होते. अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार मारला आणि सर्व भारतीयांनी एकच जल्लोष केला. या सामन्यानंतर अनेकांनीच सोशल मीडियाद्वारे दिनेश कार्तिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अमिताभ बच्चन यांनीसुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केला. मात्र, ते ट्विट करताना त्यांच्याकडून एक चूक झाली. यासाठी त्यांना दिनेश कार्तिकची माफीदेखील मागावी लागली.
यासोबतच अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या चौथ्या लग्नाविषयीच्या चर्चा मनोरंजन विश्वात पाहायला मिळाल्या. हॉलिवूडचा स्टार ब्रॅड पीटपासून विभक्त झाल्यानंतर आता अँजेलिना एका ब्रिटीश व्यावसायिकासोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याव्यतिरिक्त मनोरंजन विश्वातल्या दिवसभरातल्या काही निवडक घडामोडी पाहुयात..
..अन् बिग बींना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी
आता चौथं लग्न करायला अँजेलिना जोली सज्ज
आदिनाथ- उर्मिलाच्या चिमुकलीचे नाव कळले का?
‘करिअरपेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्नांचा सामना करणं हाच मोठा संघर्ष’
कतरिनासोबत सर्वांत मोठ्या डान्स फिल्ममध्ये झळकणार करणचा ‘स्टुडंट’
माझ्या प्रियकरांनीच मला कायम दगा दिला: कंगना रणौत
PHOTOS : तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचा साखरपुडा
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री साकारणार प्रियांका गांधींची भूमिका
आइस्क्रिम भरवत किंग खान कतरिना म्हणाला, ‘आय लव्ह यू’
…म्हणून आईच्या निधनानंतर ३ वर्षांनी संजय दत्तच्या भावनांचा बांध फुटला