छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, काही मालिका या कमी कालावधीत अमाप यश मिळवतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे सुंदरा…मनामध्ये भरली. अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवणारी ही मालिका सध्या अनेक स्त्रियांची आवडती मालिका ठरत आहे. या मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळण घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न झाल्यापासून एकही दिवस एकमेकांशी नीट न वागणाऱ्या अभिमन्यू आणि लतिका यांच्यातील मैत्री हळूहळू वाढू लागली आहे. त्यातच या दोघांमध्ये कितीही वाद होत असले तरीदेखील ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसून येतं. अभ्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लतिका त्याला सातत्याने मदत करत असून येणाऱ्या प्रत्येक अडचणीला ती अभिबरोबर सामोरी जात आहे. त्यामुळे आता अभिच्या मनात असलेली लतिकाविषयी नाराजी कमी होताना दिसत आहे.

‘आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार’ असे लतिकाने अभिला सांगितले आहे. त्यामुळे या पुढील वळणावर अभिमन्यू लतिकाची साथ देणार आहे. येत्या भागात अनेक घडामोडी घडणार आहे. त्यामुळे रविवारी या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. या नव्या भागात नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना मालिकेचा हा महारविवार भाग पाहावा लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv show sundara manna madhe bharle latika and abhya special episode ssj
First published on: 06-01-2021 at 17:03 IST