झी टीव्ही वाहिनीवर दोन नव्या मालिका

‘तेरे बिना जिया जाए ना’ या मालिके तून अंबिकापूर राजघराण्यातील नायक आणि सर्वसाधारण घरातील नायिका अशी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘झी टीव्ही’ वाहिनीवर ‘तेरे बिना जिया जाए ना’ आणि ‘अगर तुम ना होते’ या दोन मालिका लवकरच प्राइम टाइममध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. गेल्या दीड वर्षात करोना आणि टाळेबंदी यामुळे जवळपास सगळ्याच वाहिन्यांवरील नव्या मालिकांचे सोहळे डिजिटली पार पडले. कलाकार मंडळीही चाहत्यांशी आणि पत्रकारांशी डिजिटली संवाद साधत होती. मात्र आता खऱ्या अर्थाने निर्बंध शिथिल झाल्याने या दोन्ही मालिकांचा शुभारंभ नुकताच मोठ्या थाटामाटात झालेल्या सोहळ्यांमधून करण्यात आला. यानिमित्ताने, ‘तेरे बिना जिया जाए ना’ या मालिके चे निर्माते आणि कलाकार यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याची संधी मिळाली.

‘तेरे बिना जिया जाए ना’ या मालिके तून अंबिकापूर राजघराण्यातील नायक आणि सर्वसाधारण घरातील नायिका अशी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेता अविनेश रेखी आणि अभिनेत्री अंजली तात्रारी ही जोडी या मालिकेतून झळकते आहे. कृषा चतुर्वेदी आणि देवराज सिंग राठोड अशी हे दोघे साकारत असलेल्या पात्रांची नावे आहेत. ही कथा थोडी वेगळी असून इतर वेळी दाखवतात तशी नायिका ‘बिचारी’ म्हणून न दाखवता तिला स्वत:ची अशी मतं आहेत, असं या चित्रपटाची नायिका अंजली सांगते. उदयपूरमध्ये सध्या या नव्या मालिके चे चित्रीकरण सुरू झाले आहे. नुकताच या मालिके च्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. प्रेमकथा आणि कौटुंबिक नाट्य यावर भर असलेली ही मालिका ९ नोव्हेंबरपासून झी टीव्हीवर दररोज सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

‘राजघराण्यातील तरुणाची भूमिका असल्याने मी स्वत: आत्मविश्वासाने एक राजघराण्यातील तरुण कसा चालेल, बोलेल यासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्याही तयारी के ली आहे. त्यासाठी मी अनेक चित्रपट, मालिका, लघुपट, माहितीपट जे जे हातात लागेल, ज्यातून मला राजघराण्यातील व्यक्ती अशा राहतात हे कळेल यावर मी खूप भर दिला. तसेच आज जी राजघराण्यातील प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांनाही मी फॉलो केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा देखणा आणि बांधेसूद राजपुत्र दाखवण्यासाठी मला १३ किलो वजन कमी करावे लागले आहे’, असे मालिके चा नायक अभिनेता अविनेश रेखी याने सांगितले. तर ‘आम्ही यापूर्वी काल्पनिक कथेवर आधारित मालिका केल्या नव्हत्या. त्यामुळे ‘तेरे बिना जिया जाए ना’ हा आमचा काल्पनिक (फिक्शन) मालिकेतला पहिलाच प्रयत्न आहे. आम्हाला या मालिकेतून आमचा ब्रॅण्ड पुढे आणायचा उद्देश आहे. आज माध्यम कोणतेही असो सगळीकडे चांगल्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. ओटीटी असो नाहीतर दूरचित्रवाणी… आजचा प्रेक्षक खूप जाणता आहे. त्यांना आकर्षित करू शके ल असाच आशय देणं ही आजची गरज आहे. ओटीटीवरही अशा कौटुंबिक नाट्य असलेल्या मालिकांची निर्मिती करणं कठीण नाही, मात्र अशा आशयासाठी दूरचित्रवाणी हेच मुख्य आणि प्रभावी माध्यम राहिले असल्याने ही मालिका आम्ही झी टीव्हीवर आणली आहे’, अशी भावना निर्माते मोहम्मद नोरानी यांनी व्यक्त के ली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two new series on zee tv channel akp