मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास आहे. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.

‘माझी आई श्रीमती. सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. तसेच तिच्यावर प्रेम करत असणाऱ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा’ असं ट्विट अजिंक्य देवने केलं आहे.

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Sunetra Pawar gave a loan of 50 lakhs to Pratibha Pawar and 35 lakhs to Supriya Sule
सुनेत्रा पवारांनी प्रतिभा पवारांना ५० लाख तर, सुप्रिया सुळे यांना दिले ३५ लाखांचे कर्ज
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

अभिनेत्री सीम देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देव हा लोकप्रिय अभिनेता आहे.

काय आहे अल्झायमर आजार?

अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश. साध्या सरळ भाषेत सांगाचे झाले तर विसरभोळेपणा. हा वार्धक्यामध्ये संभवणारा एक घातक आजार आहे. हा आजार ६५ व्या वयानंतर संभवतो. तरी देखील स्मृतिभ्रंशाच्या एकूण रुग्णांपैकी साधारण ५ % रुग्ण हे चाळीशी-पन्नाशीतले असतात असे अभ्यासातून समोर आले आहे. या रोगामध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर विपरित परिणाम होऊन हळूहळू पूर्ण स्मृतिभ्रंश होतो.