मराठी चित्रपटसृष्टीमधील एक अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे महेश कोठारे. त्यांचे कलाविश्वामध्ये मोलाचे योगदान आहे. पण सध्या ते चित्रपटसृष्टीपासून लांब असले तरी आजोबा होण्याचा आनंद घेताना दिसतात. ते सतत त्यांची नात जिजासोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

नुकताच महेश कोठारे यांनी मुलगा आदिनाथ कोठारे, सुन उर्मिला कोठारे आणि नात जिजासोबत झी मराठी वाहिनीवरील ‘अळीमिळी गुपचिळी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान जिजाचा गोंडस अंदाज पाहायला मिळाला आहे. तिने आईसोबत काही बडबडगीते गाऊन दाखवली तर ‘अग्गंबाई सासुबाई’ या गाण्यावर ठेका धरला. कोठारेंची ही नात लहानपणासूनच अनेकांची मने जिंकण्यास सफल झाली आहे.

बिनधास्त जिजाचा गोंडस अंदाज कार्यक्रमात पाहायला मिळाला. तेथे तिला माशाचे तोंड कसे असते विचारण्यात आले होते. त्यावर तिने लगेच तशी नक्कल करुन दाखवली. त्यानंतर चिऊ कशी ओरडते, काऊ कसा ओरडतो, साप कसा करतो, वाघ कसा आवज काढतो असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर जिजाने त्यांची मस्त नक्कल करुन दाखवल्या आहेत. जिजाने आई सांगेल त्या प्राण्याची आणि पक्षाची नक्कल करुन दाखवली आहे.