आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी वेगवेगळ्या महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. त्यांना धन्यवाद म्हणण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. असाच एक प्रयत्न केला आहे अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याने. विकीने आज अंकिताला महिला दिनानिमित्त एक खास भेट वस्तू दिली आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाह बंधनात अडकली. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी कोट्यावधींचा खर्च केला होता. अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून ती सतत तिचे आणि विकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.

navi mumbai cyber crime marathi news
भरघोस परताव्याचे आमिष, गुंतवले ४५ लाख ६९ हजार ५०० रुपये आणि परतावा शून्य; फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद 
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

“ते राजा अन् आम्ही…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्माच्या शो वर केले गंभीर आरोप

नुकताच तिने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा पती विकी जैनसुद्धा पाहायला मिळत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने विकीने अंकिताला एक खास भेट दिली आहे. विकीने स्वतः व्हिडीओमध्ये याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, प्रत्येक नवऱ्याने आज आपल्या बायकोला ही भेटवस्तू द्यायलाच हवी आणि ती भेट म्हणजे शांत बसणे.

‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे नावंही ठरलं!

विकी अंकिताला भेट म्हणून आजचा पूर्ण दिवस शांत बसणार आहे. त्यासोबत ती जे काही सांगेल ते तो मुकाट्याने ऐकणार आहे. हेच तिच्यासाठी गिफ्ट असल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक नवऱ्याने वर्षातून एकदा तरी हे गिफ्ट आपल्या बायकोला द्यायलाच हवं, असाही सल्ला त्याने इतर पुरुषांना दिला आहे. दरम्यान यावर अंकिताला खूपच हसू आलं. विकीने अंकितासोबतच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.