बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानं अनेक चित्रपटाचे विक्रम मोडीत काढले आहेत. अगदीच कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट एवढी मोठी कमाई करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाच्या कमाईची तर सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. पण यासोबतच चर्चा आहे ती चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची. विशेषतः दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेता अनुपम खेर यांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

विवेक अग्निहोत्रींचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अभिनेता दर्शन कुमार, पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका आहे. या सर्वांच्याच भूमिकांचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटासाठी विवेक अग्नितहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी या चित्रपटात राधिका मेनन ही भूमिका साकारली आहे. त्यांनी ५० ते ७० लाख रुपये एवढं मानधन घेतलं आहे. याशिवाय कृष्णा पंडित या मुलाची भूमिका साकरणाऱ्या अभिनेता दर्शन कुमार यानं या चित्रपटासाठी ४५ लाख रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

आणखी वाचा- ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईची रक्कम दान का करत नाहीस? IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट जेवढा सोशल मीडियावर गाजतोय तेवढंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं कौतुक होताना दिसतंय. विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनानं सर्वांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांनी तब्बल १ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी या चित्रपटात पुष्कर नाथ ही दमदार भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अनुपम खेर यांना १ कोटी रुपये एवढं मानधन देण्यात आल्याची माहीती मिळत आहे.

आणखी वाचा- “अमिताभ बच्चन यांनी नकार दिला असता तर…”, ‘रनवे 34’बाबत अजय देवगणचा मोठा खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. त्यांनी या चित्रपटात IAS ब्रह्म दत्त यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी १.५ कोटी एवढं मानधन घेतलं आहे. मिथुन चक्रवर्ती हे या चित्रपटात सर्वाधिक मानधन घेणारे एकमेव अभिनेता आहेत. याशिवाय लक्ष्मी दत्त ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटासाठी ५० लाख रुपये एवढं मानधन घेतलं आहे.