VIDEO : ‘पद्मावत’चा नवीन टीझर पाहिलात का?

‘सुलतान के तलवार से ज्यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाडियोंकी सीने में है’

raza murad, ranveer singh
रझा मुराद, रणवीर सिंग

राजस्थान, गुजरात, हरयाणा आणि मध्यप्रदेश या चार राज्यांमध्ये असलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटावरील बंदीला सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘पद्मावत’चा नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३० सेकंदांच्या या टीझरमध्ये रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांनी साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जी आणि महारावल रतन सिंह या भूमिकांची पुरेपूर झलक पाहायला मिळते.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने ट्विटरवर हा टीझर शेअर केला आहे. ‘कह दो अपने सुलतान से, के उनके तलवार से ज्यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाडियोंकी सीने में है,’ असे काही दमदार संवादही यामध्ये ऐकायला मिळतात. जलालुद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रझा मुराद यांचीही झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

वाचा : बॉलिवूडमध्येही येणार ‘आपला मानूस’

१८० कोटींचा बजेट असलेला हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही राजपूत संघटनांचा विरोध काही कमी झाला नाही. त्यामुळे अनेकांचे लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागून राहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Watch padmaavat new teaser ranveer singh aces mad king act

ताज्या बातम्या