‘क्वीन’ चित्रपटातील चुलबुल्या मुलीच्या भूमिकेनंतर कंगना रणावत आता बोल्ड, अडाणी आणि गन अवतारात दिसणार आहे. आगामी ‘रिव्हॉल्वर राणी’ या चित्रपटात कंगनाने याआधी कधीही न साकारलेली भूमिका पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात कंगनाने फॅसन, पन, आणि गन म्हणेज फॅशन, फन आणि गन्सची आवड असलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. ‘रिव्हॉल्वर राणी’मध्ये कंगना अडाणी भाषा बोलताना आणि ग्लॅमरस रुपात पाहवयास मिळणार आहे. या चित्रपटात वीर दासचीही प्रमुख भूमिका आहे. कंगनाच्या प्रियकराच्या भूमिकेत वीरदास दिसणार आहे. पियुष मेहरा, झाकीर हुसेन आणि पंकज सारस्वत यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.


साई कबीर श्रीवास्तव दिग्दर्शित आणि राजू चढ्ढा, क्राउचिंग टायगर प्रॉडक्शनची निर्मिती असलेला रिव्हॉल्वर राणी ११ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.