अभिनेता अनिल कपूर अशा कलाकारांपैकी एक आहेत जे आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या गुड लुक्ससाठीही प्रसिद्ध आहेत. अनिल कपूर खूप बिनधास्त अभिनेता म्हणून ओळखले जातात. अनेकदा ते मुलाखतींमध्ये त्यांची मतं बेधडकपणे मांडताना दिसतात. काही वर्षांपूर्वी अनिल कपूर यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत असंच एक विधान केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टीच्या लिप्स सर्जरीवर कमेंट केली होती.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो नेहमीच वादग्रस्त वक्तव्य आणि कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. अनेकदा या शोमध्ये सेलिब्रेटी असं काही बोलून जातात ज्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरू होतो. अनिल कपूर यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. याच शोमध्ये अनिल कपूर यांनी शिल्पा शेट्टीच्या ओठांबाबत वक्तव्य केलं होतं.

करण जोहरनं रॅपिड फायर राउंडमध्ये अनिल कपूर यांनी प्रश्न विचारला होता, ‘तुम्ही अखेर असा कोणाचा चेहरा पाहिला होता ज्याचा बोटॉक्स जॉब बिघडला होता?’ या प्रश्नावर काही वेळासाठी अनिल कपूर शांत राहिले आणि त्यानंतर ते म्हणाले, “कोण आहे यार? ते लिप्सवर काय करतात ते?” यावर करण म्हणाला, “कोलेजन”

अनिल कपूर म्हणाले, “ओके मी कोलेजनबद्दल बोलू शकतो? शिल्पा शेट्टीनं ‘बधाई हो बधाई’च्या शुटिंगच्यावेळी तिच्या ओठांवर सर्जरी केली होती जे मला अजिबात आवडलं नव्हतं. त्यावेळी तिचे ओठ खूपच जाड झाले होते. पण आता तिचे ओठ सुंदर दिसतात.” दरम्यान शिल्पा शेट्टी आणि अनिल कपूर इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन कलाकार आहेत. दोघंही चाहत्यांना फिटेनससाठी प्रेरणा देतात. शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची ‘निकम्मा’ चित्रपटात दिसली होती. तर अनिल कपूर यांचा ‘जुग जुग जियो’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे.