scorecardresearch

रेखा असं काय म्हणाल्या की जया यांना बसला धक्का?

लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा दोघींनी एकमेकींकडे पाहिले

जया बच्चन आणि रेखा
जया बच्चन आणि रेखा

जया बच्चन आणि रेखा जेव्हा जेव्हा समोरा- समोर येतात त्या क्षणाची बातमी ही होतेच. कधी या दोघींना एकत्र हसताना आणि गप्पा मारताना बघितले गेले आहे तर कधी दोघी एकमेकींना दुर्लक्षित करत असल्याचे पाहण्यात आलेय. शनिवारी पुन्हा एकदा असे काही झाले की जया बच्चन आणि रेखा या एकमेकांसमोर आल्या.

आतापर्यंत कोणताही सिनेमा तोडू शकला नाही ‘जय संतोषी मां’चा रेकॉर्ड

उपराष्ट्रपती यांच्या निवडीसाठी मतदान करायला लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य संसद भवनात मतदान करायला हजर राहिले होते. तेव्हा रेखा आणि राजीव शुक्ला हे अरुण जेटली यांच्या ऑफिसजवळ असणाऱ्या लिफ्टची वाट पाहत उभे होते. त्याच लिफ्टमध्ये जया होत्या. लिफ्टचा दरवाजा जेव्हा उघडला तेव्हा दोघींनी एकमेकींकडे पाहिले. वातावरणातला जडपणा कमी करण्यासाठी रेखा यांनी जया यांची गळाभेट घेतली. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रेखा यांनी जया यांच्या कानात असे काही सांगितले की ते ऐकून जया यांना धक्काच बसला. तेव्हापासून रेखा यांनी जया यांना नेमकी काय सांगितलंय असेल याचीच चर्चा रंगताना दिसतेय.

सेन्सॉर बोर्डापासून काहीच प्रॉब्लेम नाही- अजय देवगण

राज्यसभेतील अनुपस्थितीवरुन माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यावर नेहमीच टीका होत आली आहे. तरीही दोघांनीही उपराष्ट्रपती यांच्या निवडीसाठीच्या मतदानाला आवर्जून हजेरी लावली. सचिन आणि रेखा हे दोघंही २०१२ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. आतापर्यंत सचिनची हजेरी फक्त ७ टक्के आहे तर रेखा यांची फक्त ५ टक्के.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-08-2017 at 17:27 IST

संबंधित बातम्या