वादग्रस्त वक्तव्य करुन कायम चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याची पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्याने पंडितांविरोधात अपशब्द वापरल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडीओ झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच संतापाची लाट उसळली असून त्याला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसंच भाजपा नेता कपिल मिश्रा यांनीदेखील एजाज खानला अटक करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एजाजचा व्हिडीओ हा एक वर्षापूर्वीचा असून त्याने ८ सप्टेंबर २०१९ रोजी त्याच्या युट्यूब चॅनेलवर तो शेअर केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावेळी दिल्लीत एका युवकाची हत्या झाली होती. त्यासंबंधी एजाजने व्हिडीओ शेअर करत पंडितांवर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

एजाजला अटक करण्याची मागणी

एजाजचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. सोबतच भाजपा नेते कपिल मिश्रा यांनीदेखील एजाजला अटक व्हावी असं म्हटलं आहे. एजाजने जे वक्तव्य केलं आहे त्याप्रकरणी त्याने माफी मागून काही होणार नाही. लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असं कपिल मिश्रा म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why a year old video of ajaz khan went viral twitter became top trend ssj
First published on: 23-10-2020 at 10:59 IST