बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या कामाला दाद देणारा ‘स्टार स्क्रिन पुरस्कार २०१६’चा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. बी टाऊनमधील विविध कलाकार आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. पुरस्कार सोहळ्यांची रंगत आणि कलाकारांचे धम्माल परफॉर्मन्सेस यांच्या जोडीनेच प्रेक्षकांनी उत्सुकतेत अधिक भर घातली ते सलमान-शाहरुख यांच्या उपस्थितीने. या सोहळ्यामध्ये दबंग सलमान खान आणि शाहरुख खान एकाच मंचावर दिसले.

नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड्स’च्या व्यासपीठावर सलमान-शाहरुखने आपल्या चाहत्यांना दिलासा दिला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी एकत्रित काम करण्यास तयारी दर्शविली. आम्हाला दोघांना बुद्धिमान लेखक आणि संयमी निर्माता एकत्र आणू शकतो, असे त्यांनी म्हटले.  या कार्यक्रमात त्यांना कोणत्या दिग्दर्शकासोबत तुम्हाला एकत्र काम करायला आवडेल, असे देखील विचारण्यात आले. कोणासोबत काम करायच ते आमच्या डोक्यात आहे. असे सांगत दिग्दर्शक किंवा निर्मात्याच्या नावावर त्यांनी मौन बाळगले होते. या कार्यक्रमामध्ये शाहरुख-सलमान एका व्यासपीठावर दिसले खरे. पण शाहरुख खान मात्र सोहळ्यातून मधूनच निघून गेला. या कार्यक्रमामध्ये आपल्याला एकही पुरस्कार मिळाला नाही. म्हणून शाहरुख निराश झाला, असावा असे तर्क वितर्क सध्या बॉलिवूडमध्ये रंगविले जात आहेत.

‘स्टार स्क्रिन पुरस्कार २०१६’चा दिमाखदार सोहळा प्रेक्षकांना ३१ डिसेंबरला टीव्हीवर पाहता येणार आहे. शाहरुख हा कार्यक्रम अर्धावरच सोडून गेल्यानंतर सलमानने शेवटपर्यंत या कार्यक्रमात उपस्थित होता.  यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे पाहता या पुरस्कारांसाठी कलाकारांमध्येही चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले. शूजित सरकारच्या ‘पिंक’ या चित्रपटाचा स्टार स्क्रिन पुरस्कार सोहळ्यांवर दबदबा पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह या चित्रपटाच्या वाट्याला चार पुरस्कार आले आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि रितेश शाहला सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अवघ्या काही वर्षांमध्येच अभिनय क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारांवर कब्जा केला. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्षवेधी ठरले ते म्हणजे किंग खान आणि सलमान खानचे सूत्रसंचालन. सलमान आणि शाहरुखच्या सूत्रसंचालनासोबतच या पुरस्कार सोहळ्याचा काही भाग निर्माता-दिग्दर्श करण जोहर आणि करणसिंग ग्रोवर यांनी सूत्रसंचालित केला.

वाचा- सलमान-शाहरुख एकत्रित काम करतील पण…