काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस’ या मालिकेतील खळबळजनक गौप्यस्फोटांमुळे चर्चेत आलेली आकांक्षा शर्मा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. आकांक्षा शर्मा ही क्रिकेटपटू युवराज सिंगचा भाऊ झोरावर सिंग याची पत्नी आहे. आकांक्षा हिने बिग बॉसच्या घरात आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, आता आकांक्षाने झोरावर सिंग विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पॉटबॉय’ संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार आकांक्षाचे वकील मलिक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आकांक्षा झोरावर विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करणार आहे, हे खरे आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. आकांक्षाला जबर मारहाण झाली नसली तरी तिला धक्काबुक्कीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचे मलिक यांनी सांगितले.

लग्न मोडण्यासाठी आकांक्षाने सासूबाई शबनम सिंग यांना जबाबदार धरले होते. झोरावर आणि मी शारीरिक आणि मानसिकदृष्टया कधीही एकत्र येऊ शकलो नाही. आम्ही दोघे जेव्हा एकत्र बाहेर जायचो. तेव्हा सासूबाई नेहमी आमच्यासोबत असायच्या. हात पकडा, किस करा अशा त्या सूचना करायच्या. सांगून अशा गोष्टी होतात का ? हे नैसर्गिकपणे घडून आले पाहिजे असे आकांक्षाने मुलाखतीत म्हटले होते.

युवराज सिंगच्या वहिनीने ‘बिग बॉस’मध्ये केला त्याच्या भावाविषयी गौप्यस्फोट

‘बिग बॉस’मध्ये सूत्रसंचालक सलमान खानसमोर आकांक्षाने तिचे मन मोकळे केले होते. २०१४ मध्ये आकांक्षाचे युवीच्या भावासोबत लग्न झाले होते. पण लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांमध्येच तिला जगण्यापेक्षा मरणाचा मार्ग जास्त सोपा वाटू लागला. आकांक्षावर एक वेळ तर अशीही आली होती, जेव्हा तिला घर सोडून पळून जावेसे वाटत होते. पण कोणताही चुकीचा निर्णय न घेता आकांक्षाने या नात्यातून स्वत:ला वेगळं करत एकटं जगण्याचा निर्णय घेतला. ‘मला माझ्या सासरच्यांकडून काहीही नको आहे. मला फक्त जोरावरपासून घटस्फोट हवा आहे’, असे आकांक्षाने त्यावेळी म्हटले होते.

आकांक्षा शर्माने केला युवराज सिंग ड्रग्स घेत असल्याचा आरोप