समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १४१व्या श्लोकात स्पष्टच सांगतात की, ‘‘म्हणे दास सायास त्याचे करावे। जनीं जाणता पाय त्याचे धरावे।’’ जो संतजनांमध्येही जाणता आहे अर्थात सद्गुरू आहे त्याचे पाय धरण्यासाठी आवश्यक ते सर्व सायास करावेत, प्रयत्न करावेत. आता त्याचे पाय धरावेत म्हणजे काय? त्यासाठीचे सायास किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय? तर ते, ‘गुरुअंजनेवीण तें आकळेना!’ म्हणजे, गुरूनं बोधाचं अंजन डोळ्यात घातल्याशिवाय ते उकलत नाही! आता हा जो तिसरा चरण आहे तो दुसऱ्या आणि चौथ्या अशा दोन्ही चरणांशी जोडला गेला आहे. म्हणजेच सदगुरूचे पाय धरावेत म्हणजे काय आणि त्यासाठीचे सायास कोणते हे गुरूबोधाशिवाय समजत नाही. अगदी त्याचप्रमाणे जी जुनी ठेव आहे, जे आत्मसुख आहे ते खरं कोणतं, हे गुरुबोधाशिवाय समजूच शकत नाही. आता दुसऱ्या चरणाच्या अनुषंगानं आधी विचार करू. तर जो जाणता आहे त्याचे पाय धरणं म्हणजे काय? एकदा पाया पडलं की बाकी काही करायला नको, अशी एक भ्रामक समजूत आहे. परीक्षा आली, जा मंदिरात आणि पड पाया, अशी लहानपणापासून या ‘पायापडूगिरी’ची सुरुवात होते.  मग एकदा देवाला दंडवत घातला की सगळं काही मनाजोगतं होतं, असं मानण्याची मनाला सवय लागते. त्यातूनच सकाम भक्ती फोफावत जाते. तेव्हा जाणत्याचे पाय धरणं म्हणजे काय, तर त्यानं सांगितलेल्या मार्गानुसार चालणं! आणि त्या मार्गानं नेमकं चालावं कसं अर्थात त्याच्या बोधानुरूप वागावं कसं, त्या मार्गातल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयानुरूप जगावं कसं, हे केवळ सदगुरूंच्याच बोधानं समजू शकतं. गुरूबोधाचं अंजन डोळ्यात पडलं की जगाचं खरं स्वरूप उकलतं. जगाकडे भ्रामक आणि संकुचित दृष्टीकोणातून पाहणं लोपतं. जगात मायेच्या प्रभावाखाली वाहवत जाणं थांबतं.. आणि चौथ्या चरणाच्या अनुषंगाने हा तिसरा चरण सांगतो की, जी जुनी ठेव आहे, जे आत्मसुख आहे, जे आत्मधन आहे ते गुरूबोधाचं अंजन जोवर डोळ्यात पडत नाही, तोवर गवसत नाही. मृत्यूनंतरचा मोक्ष तर सोडाच, पण जगतानाचा जो मुक्तीचा अनुभव आहे, जो पूर्णतृप्तीचा अनुभव आहे, जो सगळ्यात असूनही पूर्ण निर्लिप्त असण्याचा अनुभव आहे, तो सद्गुरूशिवाय प्राप्त होऊच शकत नाही. मग कुणी म्हणतो, गुरुची काय गरज आहे? जर ते निजसुख आमचं स्वत:चंच आहे, आमच्या अंत:करणातच आहे, तर ते मिळवून द्यायला दुसऱ्या कुणाची गरजच काय? ते आमचं आम्हीच नाही का मिळवू शकत? देव आणि भक्तामध्ये सद्गुरूची मध्यस्थी कशाला? आमचं आम्हीच नाही का देवाला प्राप्त करून घेऊ शकत? त्याचं दर्शन करून घेऊ शकत? त्यासाठीचं जे आत्मज्ञान आहे ते आमचं आम्हालाच नाही का मिळू शकत? हे प्रश्न ज्या वृत्तीतून निर्माण होतात त्या अहंभावयुक्त वृत्तीला समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४२व्या श्लोकात फटकारत आहेत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ आता पाहू. हा श्लोक असा आहे:

कळेना कळेना कळेना ढळेना।

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी

ढळे नाढळे संशयो ही ढळेना।

गळेना गळेना अहंता गळेना।

बळें आकळेना मिळेना मिळेना।। १४२।।

प्रचलित अर्थ : जुने ठेवणे गुरूअंजनेवीण कळायचे नाही, संशय ढळायचा नाही, अहंता गळायची नाही आणि बळे म्हणजे हटातटाने अर्थात स्वबळावर नानाविध सायास करून आत्मधन मिळायचे नाही, हे मी अगदी त्रिवार सांगतो.

आता मननार्थाकडे वळू. इथं पहिल्या चरणात समर्थ त्रिवार म्हणतात, की तुमचं तुम्ही आत्मज्ञान मिळवूच शकत नाही!