बायको : बाबू! हल्ली मला रात्री झोप येत नाही.
नवरा : काळजी करू नकोस. झोपायचा प्रयत्न कर, तुला झोप येईल.
बायको : मी खूप प्रयत्न केला, तरीसुद्धा येत नही.
नवरा : बरं! मग एक काम कर!
आज जेव्हा तू झोपायला जाशील, तेव्हा दोन हजारापर्यंत संख्या मोज.
तुला नक्की झोप येईल.
बायको : नक्की झोप येईल ना?
नवरा : हो नक्की!
दुसऱ्या दिवशी सकाळी…
नवरा : गूड मॉर्निग! चहा घे! मग, काल रात्री झोप आली?
बायको : नाही!
नवरा : का?
बायको : तुम्ही म्हणाला होतात की,
दोन हजारापर्यंत संख्या मोज झोप येईल.
नवरा : हो!
बायको : जसं मी मोजत-मोजत हजारापर्यंत पोहचले,
मला खूप झोप यायला लागली.
मग मी ऊठले आणि किचनमध्ये जाऊन कॉफी बनवली.
कॉफी प्यायल्यानंतर मी दोन हजारापर्यंत संख्या मोजू शकले.
संख्या मोजून होईपर्यंत सकाळ झाली.
नवरा डोक्यावर हात मारतो.