(नवऱ्याच्या पायाला लागल्यानं त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये असतो…)

बायको (फोनवर) : हॅलो सर! सॉरी! आज मी ऑफिसला येऊ शकणार नाही.

माझ्या मिस्टरांच्या पायाला लागलं आहे. 

त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातलं आहे. 

त्यांची काळजी घ्यायला घरी कोणीच नाहिये. 

मी ऑफिसला येऊ शकणार नाही. 

आय अ‍ॅम सो सॉरी! ओके सर!

(फोन ठेवल्यावर काही वेळातच नवरा बायकोसाठी पोहे घेऊन येतो…)

नवरा : हे घे तुझे पोहे!

बायको : ओ बेबी! थँक्यु सो मच! तुम्हीपण घ्या ना!

नवरा : नको! मला भांडीदेखील घासायची आहेत.