सदाशिव पेठ-
गिऱ्हाईक : “हियरिंग एडचे यंत्र केवढ्याला?”
दुकानदार (गोखले) : “वीस रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंत.”
गिऱ्हाईक : “वीस रुपयांचे बघू.”
दुकानदार ( गोखले) : “हे घ्या. कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा”
गिऱ्हाईक : “हे कसं काम करतं?”
दुकानदार ( गोखले) : “काहीच काम करत नाही. पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात.” ( पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं, हेच एकमेव यंत्र आहे.)
पुणे तेथे काय उणे