“बापरे किती काळजी करते ही”
त्याच्या मनाला वाटलं. तस तिला समजून घेण्याची ओढ लागली. त्यातच एक चांगली गोष्ट झाली. त्याला कॉलेजजवळ रूम मिळाली. प्रवासाचा वाचलेला वेळ तो कॉलेजमध्ये घालावत होता. दोघांचे वर्ग वेगवेगळे असल्यानं जास्त बोलणं होत नव्हतं. मात्र हाय बाय सुरु होतं. कधी मधी मेसेज पाठवत होता. नंतर हे मेसेज दररोजचे झाले. आत ती पण रिप्लाय पाठवत होती. पण सुरुवात त्यालाच करायला लागायची. अशात फोनवर ही बोलणं व्हायचं. कॉलेजच्या गप्पां घरापर्यंत कधी गेल्या दोघांना देखील कळलं नाही. तिच्या घरची बरीचशी माहिती त्याला होती. आणि तिलाही त्याच्या बद्दलची. कॉलेजमध्ये मात्र ते जास्त बोलतं नव्हते. पण रात्रीचा फोन न चुकता. उशिरापर्यंत बोलणं व्हायचं. एवढं काय बोलता हे विचारलं तर सांगायला जमत नाही. सर्व मित्र मैत्रिणी यांच्या बद्दल जास्त गप्पा व्हायच्या. तिचं पोस्टपेड कार्ड असल्यानं बॅलन्स संपला असं कधी झालं नाही. किती वेळ बोललो याचं भान त्यांना नसायचं. फोनवर नियमित ती बोलत होती. मात्र त्या दिवशी कॉलेजमध्ये बऱ्याच दिवसांनी आवाज दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अक्षय…अक्षय”
ओळखीचा आवाज असल्यानं त्याने लगबगीनं पाठीमागे बघितलं. तिच्यासोबत एक मैत्रीण होती.
“आरती तू ? बोल ना काय म्हणतेस ?”
“नॅशनल सेमिनार बद्दल बोलायचं होत”
त्याला याबाबत काहीच माहिती नव्हती प्रश्नार्थक नजरेनं त्यानं विचारलं
“कसला सेमिनार?”
“अरे सायकॉलॉजीचा, नाशिकला होतोय”
असं सांगत तिनं विचारलं
“तू येणार का?”
नाशिकला जाऊन यायचं म्हणजे दिवस सोबत घालवता येणार हा विचार करत तो म्हणाला.
“हो येणार की, नक्की जायला हवं”
काहीही माहिती नसताना त्यानं होकार दिला.
मॅम आणि मुलं मिळून जायचं ठरलं. मात्र काही कारणांनी मॅमचं अचानकपणे कॅन्सल झालं. त्यापाठोपाठ काही मुलीही यायला नको म्हणाल्या. जाण्याचं जवळ जवळ आता रद्द होणार हे फिक्स होतं. पण अक्षयला मनातून जावं असं खूप वाटतं होतं. कदाचित या निमित्ताने तिला मनातलं बोलायची संधी मिळेल असा त्याचा अंदाज होता. म्हणून त्यानं स्वतः सेमिनारला जाण्याचा मोर्चा हाती घेतला… दोघा तिघांना विचारलं. मात्र कोणी तयार होतं नव्हतं. भरपूर प्रयत्न केल्यानंतर. धीरज, सुशांत आणि रोशन तयार झाले. त्यामध्ये धीरजने यायची तयारी दर्शवली. मात्र त्यातच पण घातला…

मराठीतील सर्व लव्ह डायरिज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive love stories in marthi
First published on: 08-08-2017 at 01:01 IST