ओठावरच्या लिपस्टिकच्या रंगसोबत बॉयफ्रेंड बदलणारी ती. सॉरी… काहींना हे वाक्य जाम खटकू शकत. कदाचित काही मुलींच्या भावना देखील यामुळे दुखावतील. पण या समाजात जो उघड्या डोळ्यांनी वावरतो तो हे वाक्य खोडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार नाही. कारण या वर्गातील खंडीभर मुली तुम्हाला सहज भेटतील. आता समाजातील प्रथेनुसार ती छत्तीस नखरेवाली, ओवाळून टाकलेली, याड लावणारी किंवा भंपक पोरगी अशी कोणतीही उपमा देऊन तिच्या चारित्र्याचे धिंडोरे काढण्याचा वेडेपणा मला निश्चितच करायचा नाही. पण तिची कहाणी म्हणजे एक रंग बदलणार रसायन असल्याची अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. ती कोण? सध्या ती काय करते? असे काही प्रश्नही कदाचित मनात येतील. विचार करायला हरकत नाही, पण तिचा शोध घेण्याची गरज नाही. कारण ‘तू माझा विचार करु शकतोस, पण मी अशी का? या प्रश्नाच उत्तर शोधू नकोस’ हे तिच्या जगण्याच ब्रीदवाक्य होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बघता क्षणी नजरेत भरावी, अशीच होती ती. लैला तिच नाव. ‘बडे बाप की बिघडी हुई औलाद…’ असं तिच्या बाबतीत म्हणता येणार नाही. कारण ती सर्वसामान्य कुटुंबातलीच होती. कॉलेजमधील तिची एन्ट्री भल्याभल्यांना घायाळ करुन सोडायची. पक्याच्या नजरेत ती पडली अन् तो घायाळ झाला. कॉलेजच्या कॅंटीनमध्ये पक्याने टाकलेला कटाक्ष तिने कॅच जरुर केला. पण प्रेमाची मॅच सुरु करण्यासाठी महत्त्वाची असणारी स्माइल तिने राखून ठेवत, आपल्या तोऱ्यात निघून गेली. दोघांच्यातील हा प्रकार पक्याच्या मित्रांनी लगेच हरला. अन् त्यांनी पक्याच मजनू असं नामकरणच करुन टाकलं. मग गजबजलेला कॅंटीनचा कट्टा असो, आरडा ओरडा असणारे खेळाचे मैदान असो किंवा शांतता राखा, अशी सूचना असणारी कॉलेजची लायब्रेरी असो लैलाची एन्ट्री झाली की, मजनूच्या आरोळ्या आणि प्रेमाच्या चारोळ्या सुरु व्हायच्या. हे सर्व घडत असताना दोघांचे प्रेम नजरेच्या पुढे काही सरकताना दिसत नव्हतं.

मराठीतील सर्व लव्ह डायरिज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive marathi love stories one girl love with two boys and its unbelievable fact
First published on: 24-08-2017 at 01:00 IST