ओ..गाववाल्यांनु ऐकलात काय..राग आणि प्रेम या दोनच भावनांनी माणसाचो स्वभाव बदलता. कोकणातली माणसा फणसासारखी असतत असा म्हणतत..ता अगदी खरा असा. वरसून काटे असले तरी आतून रसाळ असतत. रागवतली पण उगच्यो उगीच राग धरून बसन्यातली नाहीत ती. काही झाला तरी स्वाभीमान सोडूची न्हाय. माझ्या आणि सरिताच्या बाबतीत ही असाच झाला. आम्ही दोघा एकाच गावचे..एकत्र लहानाचे मोठे झालो. तर राजेश माझो लहानपणापासूनचो मित्र. राजेशचे डोळे तपकीरी रंगाचे होते म्हणून त्याला घाऱया म्हणूनच हाक मारायचे. आमच्या दोघांच्याही घरची परिस्थिती सारखीच..एकच पँट घाल तीन-तीन वर्षा..आठवी ते दहावी अशी तीन वर्षा शाळेची नवीन पँट घेतलीच नव्हती, पण खिशात नाय दमडी आणि खावाची हा कोंबडी असा आमचो माज असायचो..तरी घाऱया माझ्यापेक्षा हुशार होता. परिस्थितीची जाण होती त्याका. त्यामुळे वर्गातल्या मुलींच्या डोळ्यात तो हिरो व्हतो. मी मात्र आपलो जेमतेम…सरिताचा घर माझ्या घरापासून तसा जवळच व्हता. त्यामुळे शाळेत एकत्र जायचो. वाटेत घाऱया भेटायचो. मी अभ्यासात जेमतेम असल्याचा सरिताक चांगला माहित व्हता म्हणून ती नेहमी माका मदत करायची. बेस्ट फ्रेंड झाली होती ती माझी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंब्याची कलमा होती त्यांची. मी सरिताच्या घरवाल्यांना आंबे काढून देऊचय..मोबदल्यात सरिता माका अभ्यासात मदत करायची आणि तिची आई पिशवीभर आंबे पण देऊची. त्यामुळे माझ्या घरचे पण काही बोलूचे नाय..उलटा सरिताचा आणि तिच्या घरवाल्यांचा कौतुक व्हायचा माझ्या घरी. सरिता हुशार होती ना माझ्यापेक्षा म्हणून.

मराठीतील सर्व लव्ह डायरिज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi malvani love story konkani couple romantic love stories in marathi
First published on: 11-04-2017 at 01:34 IST