– सुनील धवन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना महामारीमुळे पहिल्यांदाच आरोग्य विमा योजनेचं महत्व कधी नव्हे तितकं प्रकर्षाने समोर आलं आहे. करोना संकटामुळे रुग्णालयात जवळपास लाखो रुपयांचा खर्च येत असताना ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना आहे त्यांच्यासाठी ते वरदानच ठरल्याचं सिद्ध झालं आहे. फक्त करोनाच नाही तर आरोग्य विमा योजनेमुळे कोणत्याही आजारासाठी तुम्हाला तुमच्या सेव्हिंगला हात लावण्याची गरज भासत नाही. यामुळे फक्त घरातील मोठ्यांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला पुरेसा आरोग्य विमा कवच असणं अनिवार्य आहे. आजार किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कधीही आणि कोणावरही येऊ शकते.

आरोग्य विमा संरक्षणासोबतच विम्याचा हफ्ता तुम्हाला कर कमी करण्यासही मदत करतो. आरोग्य धोरणात कराचा लाभ हा मर्यादित असला तरी तो आपल्याला आपले कर उत्तरदायित्व कमी करण्यात आणि सोबतच आरोग्य विम्याचा लाभ उपभोगण्याचा मार्ग देतो.

आरोग्य विमा योजनेतील विमा हफ्त्यांवरील मिळणारा कर लाभ आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०ड अंतर्गत येतो. यातील जास्तीत जास्त कर लाभ २५ हजार ते ५० हजारांपर्यंत आहे. मात्र नेमका किती कर लाभ होणार हे तुमच्या वयावर अवलंबून आहे. जर तुमचं वय ६० पेक्षा कमी असेल आणि तुम्ही स्वत:साठी किंवा ६० पेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यासाठी आरोग्य विमा योजना घेत असाल तर आर्थिक वर्षात जास्तीत जास्त वजा होणारी रक्कम २५ हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर जास्तीत जास्त कर लाभ ५० हजारांपर्यंत आहे.

याचा अर्थ जर तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमच्यासाठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा योजना घेणार असाल तर १ लाखांपर्यंत कर लाभ मिळू शकतो. अशाप्रकारे विम्याचा हफ्ता भरल्याने तुमचं एकूण उत्पन्न समान राहील आणि यारितीने तुमचं कर उत्तरदायित्वदेखील कमी होतं.

आरोग्य विमा योजना खरेदी करताना निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी वैयक्तिक आरोग्य योजना खरेदी करा. पण जर तुमचं मुलांसोबतचं छोटं कुटुंब असेल तर तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लान निवडू शकता. या प्लानमध्ये विम्याची रक्कम (कव्हरेज) सर्व कुटुंबातील सदस्यासांठी समान असते आणि ती प्रत्येकासाठी ठरवण्यात आलेली नसते. सर्व कुटुंबीय एकाच वेळी रुग्णालयात दाखल होणार नाहीत त्यामुळे फॅमिली फ्लोटर योजना सर्व सदस्यांसाठी पुरेसं कव्हरेज टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि वैयक्तिक योजनांच्या तुलनेत विम्याचा हफ्ताही कमी असतो. मात्र आपला क्लेम रेकॉर्ड चांगला निर्माण होण्यासाठी वैयक्तिक आरोग्य विमान योजना किंवा वैद्यकीय विमा योजनेची शिफारस केली जाते.

यानंतर गंभीर आजारांवर लाभ देणारे प्लान आहेत. या प्लानमध्ये योजनेच्या कागदपत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण विमा रक्कम हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, कॅन्सर इत्यादी आजारांच्या वेळी दिली जाते. वैद्यकीय विमा योजनेच्या तुलनेत हे हे भिन्न आहे, जिथे नुकसान भरपाई-आधारित योजना आहेत. ज्यामध्ये विमा रकमेच्या आधारे रुग्णालयातील खर्चाची रक्कम विमा कंपनीकडून परतफेड केली जाते.

अॅडिक्वेट कव्हरेज खरेदी करण सर्वात कठीण टप्पा आहे. हे आरोग्य कवच खरेदी करण्याआधी आपल्याला नेमका किती कव्हरेज लागणार आहे त्याचा अंदाज घ्या, कारण हे खऱेदी केल्यानंतर पुन्हा खिशातून पैसा खर्च करण्याची तुमची इच्छा नसेल. हे आरोग्य कवच रायडर्स (पर्यायी योजना) किंवा नियमित योजना अशा वेगवेगळ्या प्रकारात कोणत्याही स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी, सामान्य विमा कंपनी किंवा जीवन विमा कंपनीकडे उपलब्ध आहेत.

वैद्यकीय विमा योजना आणि गंभीर आजार योजना यांचं दोन्हींचं समान महत्व असून सर्वच आघाड्यांवर जोखीम पत्करण्यासाठी तुमच्या आरोग्य विमा पोर्टफोलिओमध्ये त्याला स्थान असलं पाहिजे. आरोग्य कवच खरेदी करण्यासाठी करोनाचं कारण असलं तरी रुग्णालयाची बिलं आणि करातून सूट मिळवण्यासाठी हा उत्तम आर्थिक निर्णय आहे हे लक्षात घ्या.

This article was originally posted here

More Stories onएमआयसी
मराठीतील सर्व Money बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax benefit up to rs 1 lakh in health insurance plans how much can you get sgy
First published on: 01-02-2021 at 15:30 IST