भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान सुरू झाले आहे. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळी ११ वाजतापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सकाळी ७ वाजता पर्यंत ७.२२ टक्के तर ११ वाजता पर्यंत केवळ १९.७२ टक्के एवढीच मतदानाची टक्केवारी होती. मात्र दुपारनंतर प्रचंड उन असतानाही मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता कमी होताच मतदानाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोहाडी तालुक्यातील पाहुनी मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याने मतदार परत जात आहेत.

सध्या जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याने उन्हाची दाहकता लक्षात घेता मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा याकरिता प्रशासनाने महिनाभर जनजागृती उपक्रम राबविले होते. त्याचा प्रभाव मतदारांवर दिसत आहे. सकाळी मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा फारच कमी होती. मात्र दुपारनंतर त्यात चांगली वाढ झाली. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे. मतदार संघात अर्जुनी मोरगाव – ४९.१७, भंडारा – ३१.३८, गोंदिया – ३३.१५, साकोली – ३२.९९, तीरोडा – ३१.६८, तुमसर – ३१. ८६ अशी आतापर्यंत विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी आहे. सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. कुठे गर्भवती महिला तर कुठे लहान लहान मुलांना घेऊन महिलांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगानी सुध्दा उत्साहात मतदान केले.

dombivli blast update confusion over dombivli blast death toll
डोंबिवली स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून गोंधळ
lok sabha election 2024 more than 59 percent turnout in the fifth phase of ls polls
Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट
Mumbai, queues, voting machines,
मुंबई : लांब रांगा, मतदान यंत्रात बिघाड, वीजपुरवठा खंडित; विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा
wholesale inflation hit 13 month high at 1 26 percent in april
घाऊक महागाई एप्रिलमध्ये १.२६ टक्क्यांसह १३ महिन्यांच्या उच्चांकी
inflation rate in india retail inflation declines to 4 83 percent in april
एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दरात नाममात्र घसरण; खाद्यान्नांच्या किमती मात्र अजूनही चढ्याच !
loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
Buldhana Lok Sabha Seat, Last Hour Surge in Voting, Speculation, who will get Potential Gains, lok sabha 2024, mahayuti, maha vikas ahgadi, prataprao Jadhav, Narendra Khedekar, ravikant tupkar, marathi news, buldhana news, election news
‘वाढीव’ मतदान कोणाला तारक? तिघा प्रमुख उमेदवारांचे विजयाचे दावे
voter turnout, Washim district,
वाशीम जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदानाचा अंदाज

हेही वाचा…मद्य पिऊन ईव्हीएम चुकीच्या पद्धतीन सील…..निवडणूक कर्तव्यावर असताना उपअभियंत्याचा…..

उन्हाची दाहकता लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयी केल्या आहेत. मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृध्द नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्हिलचेहर तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री शाळा हे मतदान केंद्र सर्वात आगळेवेगळे ठरले आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू आहे. दरम्यान, मोहाडी तालुक्यातील पाहुणी मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडले असल्याने मतदार मतदान न करता घरी परत जात आहेत.

हेही वाचा…”वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.

सर्व उमेदवारांनी बजावला हक्क

भंडारा गोंदिया मतदार संघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे, तसेच काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सपत्नीक मतदान करीत नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजविण्याचे आवाहन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यांच्या सुकळी या गावी मतदानाचा हक्क बजावला.