-सुनील धवन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्ट फोनपासून ते आंतरराष्ट्रीय टूर बुक करण्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टी सध्याच्या घडीला ऑनलाइन करता येत आहेत. अनेक लोकांना हा सोपा पर्याय वाटतो आहे. अगदी याचप्रमाणे पैसे वाचवण्यासाठीच्या काही योजनाही ऑनलाइन आहेत. त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. गुंतवणुकीच्या अनेक योजना ऑनलाइन आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड यांचा व्यवहार ऑनलाइन करु शकता अगदी त्याचप्रमाणे टर्म इन्शुरन्स प्लानही घेऊ शकता. तुमच्या आर्थिक नियोजनाची काळजी घेणारे प्लान्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्हाला ऑनलाइन इन्शुरन्स प्लान खरेदी करायचे असतात तेव्हा काही गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स असो किंवा लाइफ इन्शुरन्स प्लान असोत ते सगळे ऑनलाइन विकत घेता येऊ शकतात. हे प्लान तुम्ही थेट घेऊ शकता किंवा इन्शुरन्स प्लान विकणाऱ्या तत्सम अधिकाऱ्याकडूनही ते ऑनलाइन घेण्याचा तुम्हाला पर्याय असतो. तुम्ही तुमचा इन्शुरन्स प्लान ऑनलाइन घेतलात किंवा इन्शुरन्स एजंटकडून घेतला तरीही त्यामधल्या अटी-शर्थी काही बदलत नाहीत. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी हे इन्शुरन्स प्लान महत्त्वाचे ठरतात. जाणून घ्या या इन्शुरन्स प्लानची खास वैशिष्ट्ये..

प्लान विकत घेण्याची सोपी पद्धत
इन्शुरन्स प्लान विकत घेण्याची पद्धत अतिशय सोपी आणि सुलभ आहे. इन्शुरन्स घेताना वय जेवढं कमी तेवढं कव्हर जास्त मिळतं. (लाइफ कव्हरच्या रकमेत वाढ होते) टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटरमध्ये तुमचं वय लिहिल्यानंतर तुम्हाला यासंबंधीचे पर्याय मिळू शकतात. तुम्ही टर्म इन्शुरन्सची रक्कम वार्षिक, दर सहा महिन्यांनी किंवा दर तीन महिन्यांनी भरण्याचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. काही प्लान्सला तुम्ही दर महिन्याला इन्शुरन्स भरण्याचा पर्यायही तुम्ही निवडू शकता.

कमी प्रीमियम भरण्याचा पर्याय
इन्शुरन्स प्लान घेताना तुम्ही कमी प्रीमियम भरण्याचा पर्यायही निवडू शकता. तुम्ही ऑनलाइन तसे प्लान निवडून त्याप्रमाणे लो प्रीमियमचा पर्याय निवडू शकता. काही प्लान असे आहेत जे तुम्ही थेट इन्शुरर्सच्या वेबसाइटवरुन घेण्याऐवजी ऑनलाइन घेतले तर २५ टक्क्यांपर्यंत स्वस्त पडू शकतात.  जाणून घ्या एका क्लिकवर 

निवडा अनेक प्रकारचे पर्याय
तुम्ही एकदा ऑनलाइन टर्म इन्शुरन्स घेण्याचा निर्णय घेतला की तुम्ही ऑनलाइन अनेक पर्याय निवडू शकता. काही प्लान हे तुमचा लाइफ इन्शुरन्सची रक्कम वाढवणारे असतील. काही प्लान हे लाइफ इन्शुरन्सची रक्कम कमी करणारेही असू शकतात. कोणता पर्याय निवडायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. विविध इन्शुरन्स कंपन्यांचे पर्यायही तुमच्या समोर असतात. कोणत्या कंपनीचा प्लान घ्यायचा आणि त्यात कोणत्या सुविधा असतील हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल.

तुमचा प्लान तुमची मर्यादा
तुम्ही ऑनलाइन बायर असल्याने टर्म इन्शुरन्सची मर्यादा किती असेल हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा तुमचा आहे. तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आरोग्यविषयक इतिहास (मेडिकल हिस्ट्री) आणि सध्या सुरु असलेल्या पॉलिसीज यांची माहितीही अपडेट करु शकता. योग्य तपशील आणि माहिती भरल्यास पारदर्शकता कायम राहते. ऑनलाइन खरेदी केलेल्या योजनांमध्ये ऑफलाइन खरेदी केलेल्या पॉलिसींपेक्षा स्थिरता अधिक असते असे निरीक्षण आहे. पॉलिसी घेणारे ग्राहक मूळ मुदतीपर्यंत प्रीमियम भरतात.

काँटॅक्ट पॉईंट्स
ऑनलाइन टर्म इन्शुरन्स घेत असताना महत्त्वाचं असतं की तुम्ही दिलेल्या संपर्क क्रमांकांवर फोन करा आणि त्याबद्दलची माहिती समजून घ्या. इन्शुररशी बोलून त्यानंतर तुम्ही ऑनलाइन प्लान घेतले तर कोणते प्लान घेतले पाहिजेत हे तुम्हाला कळण्यास अधिक चांगल्या पद्धतीने मदत होते. जेव्हा तुमची वैद्यकीय चाचणी केली जाते तेव्हा तुम्ही fix on the document submission हा पर्याय निवडू शकता. तुम्ही एकदा ऑनलाइन पॉलिसी घेतली आणि त्याचे पैसे भरले की तुम्हाला त्यासंदर्भातली कॉपी इमेलवर मिळते. तसेच ती पॉलिसी तुमच्या पत्त्यावर पोस्टानेही पाठवली जाते. तुम्ही ऑनलाइन घेतलेले प्लान रिन्यू करण्याचा पर्यायही तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतो. तुमच्या बँकेला यासंदर्भातली माहिती देणं त्यासाठी गरजेचं असतं.

टर्म इन्शुरन्स प्लान खरेदी करणं ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय ठरतो. यामुळे तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करु शकता. काही ध्येयं जी आधीच ठरवलेली असतात तीदेखील गाठू शकता.

 

More Stories onएमआयसी
मराठीतील सर्व Money बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique advantages of buying term insurance plan online know them before purchasing scj
First published on: 11-12-2020 at 16:24 IST