Fitness Routine : प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगावसं वाटतं, पण दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:च्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अशात व्यायाम करण्याची एक दीनचर्या ठरवली तर अधिक सोपे जाते; पण ही व्यायाम करण्याची दीनचर्या काही ठराविक महिन्यानंतर बदलावी का? बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की दीर्घ कालावधीसाठी नियमित एका पद्धतीचा व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर मग व्यायामाची दीनचर्या बदलणे खरंच चांगले आहे की नाही?

द इंडियन एक्स्प्रेसनी स्ट्राईड पोडियाट्री (Stride Podiatry) च्या फिजिओथेरपिस्ट डॉ. पल्लवी सिंग यांच्या हवाल्याने माहिती सांगितली आहे. त्या सांगतात, “तुमची व्यायामाची दीनचर्या बदलल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात, पण त्यासाठी तुमचे ध्येय निश्चित असणे आवश्यक आहे.”

Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

डॉ. पल्लवी सिंग सांगतात, “समतोल की राखणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे”, तुमच्या ध्येयाविषयी विचार करा, जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर व्यायामावर लक्ष केंद्रित करा. पोहणे, डान्स करणे यांसारख्या नवीन उपक्रमांचा तुम्ही समावेश करू शकता.
जर तुमचे सतत डोके दुखत असेल तर व्यायामामध्ये बदल करणे टाळा. ज्या व्यायामामुळे तुम्ही चांगले फिट आहात ते व्यायाम करणे टाळू नका.

डॉ. सिंग यांनी व्यायामाची दीनचर्या बदलण्याचे फायदे सांगितले आहे.

ताजेतवाने वाटेल – दीनचर्या बदलल्यामुळे तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येणार नाही आणि तुम्ही व्यायाम करणे थांबवणार नाही. तुम्हाला नवीन व्यायामाची दीनचर्या आवडू शकते.

तंदुरुस्त व्हाल – व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आपल्या स्नायूंवर काम करतात, त्यामुळे तुम्ही व्यायामामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहाल.

शरीरावर ताण येणार नाही – एखादी गोष्ट वारंवार केल्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. व्यायामाची दीनचर्या बदलल्याने शरीरावरील ताण कमी होऊ शकतो.

नवीन व्यायाम शिकताना सुरुवातीला कठीण वाटू शकते, पण योग्यरित्या शिकणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एका विशिष्ट कालावधीनंतर व्यायामाची दीनचर्या बदलत असाल तर योग्यरित्या व्यायाम शिकताना सुरुवातीला त्रास होऊ शकतो.

हेही वाचा : झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!

व्यायामाची दीनचर्या का बदलावी?

जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करता तेव्हा स्नायूंवर ताण पडतो. सुरुवातीला स्नायू कमकुवत असतात, त्यामुळे थोडा जरी व्यायाम केला की दुखतात; पण काही दिवसांमध्ये स्नायू अधिक कार्यक्षम बनतात.

जर तुम्ही सतत एकच एक व्यायाम करत असाल तर तुमच्या स्नायूंना या व्यायामाची सवय होते, त्यामुळे स्नायूंमध्ये बदल दिसून येत नाही.

दीनचर्येत बदल करणे गरजेचे आहे. नवीन व्यायाम हे स्नायूंसाठी एक नवीन आव्हान असते. या आव्हानांवर मात करताना स्नायू अधिक मजबूत होतात, पण तुम्ही सतत व्यायाम बदलत असाल तर तुमच्या स्नायूंना नवीन शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी समतोल राखणे महत्त्वाचे असते.

डॉ. सिंग सांगतात, “जे व्यायाम तुम्हाला आनंद देतात, अशा व्यायामामध्ये बदल करू नका. हे व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करेल. वेळोवेळी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्या शरीराचे ऐका. जर तुमचे स्नायू सतत दुखत असतील तर व्यायामामध्ये बदल कमी करा.”

ही लक्षणे जाणून घ्या..

व्यायाम बदलण्याची वेळ आली आहे हे तुम्ही खालील लक्षणांवरून ओळखू शकता.

  • जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल आणि कालांतराने शरीरावर कोणताही परिणाम दिसून येत नसेल तर तुम्हाला व्यायामामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
  • जर तुम्हाला तेच ते व्यायामाचे प्रकार करून कंटाळा आला असेल तर तुम्ही व्यायामांमध्ये बदल करू शकता.
  • नियमित व्यायाम करूनही जर तुमचे स्नायू सतत दुखत असतील तर हे समजून घ्या की, एखादा विशिष्ट व्यायाम तुमच्या स्नायूंवर ताण निर्माण करत आहे. अशावेळी व्यायामाची दीनचर्या बदलणे गरजेचे आहे.
  • एखादा व्यायाम सतत केल्याने किंवा अति जास्त प्रमाणात केल्याने तुमच्या शरीरावर ताण येऊ शकतो; अशावेळी दीनचर्या बदलण्याची आवश्यकता आहे.

आपल्या शरीराला काय आवश्यक आहे, हे समजून व्यायामाची दीनचर्या ठरविणे नेहमी चांगले असते. जर तुम्हाला याविषयी काहीही अडचण आली असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे प्रशिक्षक किंवा फिजिओथेरपिस्टचे मार्गदर्शन घेऊ शकता.