08 March 2021

News Flash

गोरेगाव परिसरात कुत्र्याची १० पिल्ले मृतावस्थेत

पिल्लांची पाहणी केली असता त्यांच्या अंगावर पोलिसांना जखमा आढळल्या.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गोरेगाव परिसरातील जवाहरनगर भागात कुत्र्याची १० पिल्ले मृत अवस्थेत सापडली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या पिल्लांना मारण्यात आले की अन्य कोणत्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.

गोरेगाव परिसरातील जवाहरनगर भागात गुरुवारी (२९ ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास कुत्र्याची १० पिल्ले मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या पिल्लांची पाहणी केली असता त्यांच्या अंगावर पोलिसांना जखमा आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. ही पिल्ले दोन महिन्यांची आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पिलांचे मृतदेह  शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.

त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पिल्लांना मारले आहे की त्यांचा इतर कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. जवाहरनगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात न आल्याने घटनेचा तपास करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:21 am

Web Title: 10 puppies found dead in goregaon area zws 70
Next Stories
1 नव्याने तपास करण्याचे आदेश द्या : तनुश्री दत्ता
2 महाविद्यालय पसंतीक्रमातही ‘एसएससी’चे विद्यार्थी मागे
3 पर्यावरणस्नेही गणेशभक्तांचा सन्मान
Just Now!
X