अंतिम वर्ष परीक्षेच्या कामकाजासाठी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय मागे घेत आवश्यकतेनुसार ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.

अंतिम वर्षांची परीक्षेची तयारी आणि निकालाच्या कामासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाविद्यालयांतील उपस्थिती १०० टक्के असावी असा निर्णय राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला प्राध्यापक संघटनांनी विरोध केला. अखेर शासनाने १०० टक्के उपस्थितीचा निर्णय मागे घेतला आहे.  परीक्षेच्या कामाशी संबंधित प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहता येईल. परीक्षा किंवा परीक्षेशी संबंधित कामकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून विद्यापीठ किंवा महाविद्यालयांनी उपस्थितीसंदर्भात  गरजेनुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत.