03 August 2020

News Flash

खुशखबर! निवड रद्द झालेल्या ११८ सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदावर मिळणार नियुक्ती

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

दिवाकर रावते

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील ११८ उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. ३१ मार्च २०१८ रोजी लोकसेवा आयोगाने या पदाकरिता ८३२ उमेदवारांची शासनास शिफारस केली. मात्र, दरम्यानच्या काळात सामान्य प्रशासन विभागाच्या १९ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि समांतर आरक्षणाच्या मुद्यावर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार लोकसेवा आयोगाने सुधारीत निकाल ‍जाहीर केला. या निकालानुसार आयोगाने ११ सप्टेंबर २०१९ रोजी नव्याने ११८ उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. त्याचवेळी आधीच्या निकालातील ११८ उमेदवारांना यादीमधून वगळण्यात आले.

आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, ११ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे शिफारस केलेल्या सर्व ८३२ उमेदवारांचे नियुक्ती आदेश काढण्यात येतील. याशिवाय या यादीमधून वगळण्यात आलेल्या ११८ उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येईल. न्यायालयाच्या निर्णयास अनुसरुन आणि नियमानुसार तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. गेली काही वर्षे हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यांना वगळणे योग्य होणार नाही अशी शासनाची भावना असल्याने शासनाने पहिल्यांदाच अशा प्रकारचा ऐतिहासीक निर्णय घेतला असल्याचे रावते यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 6:37 pm

Web Title: 118 assistant motor vehicle inspectors who opt out now will get additional posts aau 85
Next Stories
1 “राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढणार”- धनंजय मुंडे
2 सत्तेची चटक लागल्यानेच भास्कर जाधव शिवसेनेत – नवाब मलिक
3 विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत दुमत, सूत्रांची माहिती
Just Now!
X