गणेशोत्सवादरम्यान मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी घोषित केलेल्या विशेष गाडय़ांची आरक्षणे फुल्ल झाल्यानंतर आता मध्य रेल्वेने पुन्हा ११८ विशेष गाडय़ांची घोषणा केली आहे. या ११८ गाडय़ांमध्ये याआधीच सांगितलेल्या पनवेल-चिपळूण डेमू सेवेचाही समावेश आहे. त्याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव व करमाळी येथे जाणाऱ्या ७८ आरक्षित गाडय़ांचीही घोषणा करण्यात आली आहे. या विशेष दरांत आरक्षित गाडय़ांचे आरक्षण १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
०१००५/०१००६ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या दरम्यान गुरुवारवगळता दर दिवशी धावणार आहे.
०१००५ ही गाडी रात्री १२.५५ वाजता निघून त्याच दिवशी दुपारी २.४० वाजता मडगावला पोहोचेल, तर ०१००६ ही गाडी दुपारी ३.२५ वाजता मडगावहून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम आणि करमाळी येथे थांबेल.
०१०२५/०१०२६ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही गाडी ८ ते २८ सप्टेंबर या दरम्यान दर दिवशी पहाटे ५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघून त्याच दिवशी संध्याकाळी ५.०० वाजता करमाळी येथे पोहोचेल. ०१०२६ करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ९ ते २९ सप्टेंबर या दरम्यान दर दिवशी पहाटे ५.५० वाजता निघून त्याच दिवशी संध्याकाळी ५.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, पेर्नेम आणि थिविम येथे थांबेल.
०११०७/०११०८ पनवेल-चिपळूण-पनवेल ही अनारक्षित विशेष डेमू सेवा ४ ते ३० सप्टेंबर सोमवार व गुरुवारवगळता दर दिवशी धावेल. ही गाडी पनवेलहून सकाळी ११.१० वाजता सुटून चिपळूणला त्याच दिवशी संध्याकाळी ४.०० वाजता पोहोचेल. ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता चिपळूणहून पनवेलच्या दिशेने रवाना होईल आणि रात्री १०.३० वाजता पनवेलला पोहोचेल. ही गाडी रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या स्थानकांवर थांबेल. या गाडय़ांपैकी ०१००५ आणि ०१०२५ या गाडय़ांची विशेष दरांतील आरक्षणे १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.