28 March 2020

News Flash

‘इनहाऊस’ प्रवेश घेणाऱ्यांना ‘अकरावी ऑनलाइन’चे दार बंद

विद्यार्थीही प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयाचा कनिष्ठ महाविद्यालयांना फटका?

वर्ष वाया जाऊ नये यासाठी खात्रीशीर पर्याय म्हणून इनहाऊस किंवा व्यवस्थापन कोटय़ातून महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दारे बंद होणार आहेत. यामुळे शाळेशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या आणखी घटेल अशी भीती व्यक्त होत आहे. याचबरोबर विद्यार्थीही प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अकरावी प्रवेशासाठी पार पडणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. हे बदल करत असताना इनहाऊस कोटा व व्यवस्थापन कोटय़ा एकदा प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना नंतर पार पडणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. ही बाब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अनेक विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतर कोठेही प्रवेश मिळाला नाही तर किमान आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात इनहाऊस कोटय़ातून प्रवेश निश्चित करून ठेवत होते. त्यानंतर पार पडणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असायचे. पण यंदा विद्यार्थ्यांना असे करता येणार नाही. त्यांनी जर इनहाऊस कोटय़ामधून शाळेशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यांना पुढील ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. हा प्रकार कमी अथवा मध्यम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच याचा परिणाम शाळांशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशावरही होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त होत आहे.

प्रवेश प्रकियेत सुसूत्रता यावी या उद्देशाने यंदा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्या बदलाचाच हा एक भाग असल्याचे मुंबई विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. याचबरोबर यंदा तात्पुरत्या प्रवेशाची तरतूद नसल्यामुळे एकदा प्रवेश निश्चिती केल्यावर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल असेही चव्हाण यांनी नमूद केले.

chart

मुंबई महानगर विभागात वाढीव जागा

यंदा एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने होणार असून मुंबई महानगर विभागात वाढीव जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर काही नवीन महाविद्यालयांची नोंदणी झाली आहे यामुळे या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जागा वाढल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यंदा या विभागात एकूण दोन लाख ९२ हजार ९० जगा उपलब्ध आहेत. यापैकी विविध कोटय़ाच्या जागा वगळता एक लाख ५९ हजार ६८२ जागा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2017 2:21 am

Web Title: 11th admission inhouse admission quota maharashtra government
Next Stories
1 इमारतींच्या ‘यूआयडी’ मोहिमेचाही फज्जा?
2 न्यायालयाचे आदेश धुडकावणे भोवणार
3 आरोपीचा जबाब नोंदवण्यास पोलिसांना सक्त मनाई
Just Now!
X