11 August 2020

News Flash

धक्कादायक! अंधेरीतील १६ वर्षांच्या मुलावर १५ अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

तर तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवेन

Gangrape : या घटनेमुळे कोंढवा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन आरोपींना सिद्धार्थनगर येथून अटक केली. तर आणखी एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईच्या अंधेरी परिसरात एका १६ वर्षांच्या मुलावर तब्बल १५ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुलावर हा अत्याचार अल्पवयीन मुलांकडूनच करण्यात आला आहे. पीडित मुलाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर आपल्या मित्राला त्याने ही गोष्ट सांगितली. यापूर्वी २६ जुलैला आपल्यावर शेवटचा अत्याचार झाल्याचे पीडित मुलाने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी सात जणांना अटकही झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाला ब्लॅकमेल करून त्याच्यावर शारीरिक अत्याचार सुरू होते. वैद्यकीय तपासणीतही या मुलाचे लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वप्रथम २०१६ मध्ये या मुलाच्या घराशेजारी राहणाऱ्या मित्राने त्याच्यावर अत्याचार केला होता. मित्राने या सगळ्याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रण करून आपल्या इतर मित्रांना दाखवले. मात्र, त्यावेळी पीडित मुलगा प्रचंड घाबरल्यामुळे त्याने यासंबंधी कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर शेजारच्या मित्राने या मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली आणि इतर आरोपींशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवेन, अशी धमकी या पीडित मुलाला देण्यात आली. या धमकीला घाबरून पीडित मुलगा त्यांच्यासोबत अंधेरी परिसरात असणाऱ्या महानगरपालिका शाळेच्या मैदानात गेला. या ठिकाणी सर्वांनी एक एक करून त्याच्यावर अत्याचार केले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून एक मुलगा त्याच्याकडे ११०० रूपयांची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी मुलांकडून पुन्हा निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडित मुलाच्या तक्रारीनुसार आतापर्यंत चार वेळा या १५ आरोपी मुलांनी त्याच्यावर अत्याचार केले आहेत. यापूर्वी २६ जुलै रोजी माझ्यावर मुलांकडून शेवटचे अत्याचार करण्यात आले. तेव्हा मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मला मारहाण केली. त्यानंतर वेदना असह्य झाल्यामुळे पीडित मुलाने आपल्या एका मित्राला ही गोष्ट सांगितली. या मित्राने ही गोष्ट आपल्या नातेवाईकाला सांगितली. तेव्हा तो या पीडित मुलाला घेऊन पोलिसांकडे गेला आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर कुपर रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याचे लैंगिक शोषण झाल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला घरी जाऊन दिले आणि आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली. सर्व आरोपी हे १५ ते १७ वयोगटातील आहेत. या सर्वांविरुद्ध भारतीय दंडसंहितेमधील अनैसर्गिक संभोगाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2017 10:38 am

Web Title: 16 year old boy raped for a year names 15 teens in mumbai andheri area
Next Stories
1 बांधकाम व्यवसायाला तेजी
2 दहीहंडी पथकांचा शून्य अपघाताचा निर्धार
3 धबधब्यांच्या ठिकाणी कचऱ्याचा पूर
Just Now!
X