महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आता पर्यंत राज्यातील २५ लाख ७७ हजार शेतकऱ्यांना १६ हजार ६९० कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. करोनाचे संकट असल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत काहीसा अडथळा येत असला तरी, जुलै अखेपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

योजनेची अंमलबजावणी सुरू असताना करोनाचे महासंकट आले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करावी लागली. त्याचा काहिसा प्रतिकूल परिणाम अंमलजावणीवर झाल्याचे सहकार मंत्र्यांनी निदर्शनास आणले.