News Flash

 ‘सुधारणेचा प्रयोग’ म्हणून २० वर्षीय आरोपीला जामीन

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका २० वर्षीय तरुणाला उच्च न्यायालयाने ‘सुधारणेचा प्रयोग’ म्हणून अंतरिम जामीन मंजूर केला.

संबंधित आरोपीला १० फेब्रुवारीला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात बंदिस्त आहे. नुकतीच त्याने जामिनासाठी याचिका दाखल केली. आपले वय लक्षात घेता जामीन मंजूर करण्याची विनंती त्याने याचिकेद्वारे केली होती.

न्यायालयानेही त्याला अंतरिम जामीन मंजूर करताना त्याचे वय प्रामुख्याने लक्षात घेतले. तसेच त्याला प्रदीर्घकाळ कारागृहात बंदिस्त ठेवले, तर तो अट्टल गुन्हेगार बनेल, असे निरीक्षण नोंदवले. त्याच्या वयामुळेच त्याच्यात सुधारणा होण्यासाठी वाव आहे. याच कारणास्तव त्याला अंतरिम जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

याआधीही आरोपीवर विनयभंगाच्या गुन्ह्य़ासह दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, असे नमूद करताना न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी त्याला ससून रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू ठेवण्याचे आदेशही दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 2:54 am

Web Title: 20 year old accused of sexually abusing a minor girl granted bail zws 70
Next Stories
1 प्रायोगिक नाटकांचा हक्काचा मंच अद्याप दूर
2 रुग्णवाढ जेमतेम पाव टक्क्यावर!
3 ताडदेवमधील मॉल तूर्त बंदच
Just Now!
X