News Flash

पालिकेचे २०१ कर्मचारी मृत्युमुखी

सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बाधा

संग्रहीत

सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बाधा

मुंबई : मुंबई महापालिके तील विविध विभागांतील तब्बल सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली असून २०१ कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. यापैकी चौघांचा मृत्यू जानेवारीनंतर झाला आहे. मृत आणि बाधितांमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच सफाई कर्मचारी आणि अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने के वळ १७, तर पालिके ने ६७ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे.

मुंबईत करोनाचा कहर झाल्यापासून आणि आता मुंबईत करोनाची दुसरी लाट आल्यानंतर पालिके च्या आरोग्य विभागासह विविध विभागातील  कर्मचारी बाधित झाले आहेत. तर मोठय़ा संख्येने कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.  पालिके ने आतापर्यंत एक उपायुक्त व एक सहाय्यक आयुक्तही करोनाच्या संसर्गामुळे गमावले आहेत. आता फेब्रुवारीपासून करोनाची दुसरी लाट आल्यानंतरही अनेक कर्मचारी मोठय़ा संख्येने बाधित होत आहेत.

करोनाशी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. त्याअंतर्गत केंद्र सरकारने पालिके च्या के वळ १७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे, तर उर्वरित अर्जाची छाननी करून त्यांना पालिके तर्फे  मदत दिली जात आहे. आतापर्यंत पालिके ने ६७ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखाची नुकसानभरपाई दिली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत सहा हजाराहून अधिक कर्मचारी बाधित झाले आहेत. सप्टेंबपर्यंत अडीच हजार कर्मचारी बाधित झाले होते.

६,२८७ आतापर्यंतचे एकूण बाधित

२०१ करोनाने बळी गेलेले कर्मचारी

१७ केंद्र सरकारने नुकसानभरपाई दिली

६७ पालिके ने नुकसानभरपाई दिली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:09 am

Web Title: 201 employees of the bmc died due to coronavirus zws 70
Next Stories
1 कुठे चोख नियोजन, कुठे बेफिकिरी!
2 सलग दुसऱ्या दिवशी लस टंचाई
3 पुढील पाच दिवसांत राज्याला प्राणवायू 
Just Now!
X