जखमींची संख्या जास्त..
गंभीर रुग्ण मात्र कमी
गेल्या दोन वर्षांपेक्षा जखमी गोिवदांची सरकारी रुग्णालयांतील नोंद या वेळी अधिक झाली असली तरी त्यात किरकोळ जखमी झालेल्या गोिवदांची संख्या अधिक असून गंभीर किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता असलेल्या गोिवदांची संख्या मात्र निश्चितपणे घटली आहे. न्यायालयाने हंडीची उंची तसेच सुरक्षेच्या उपायांबाबतचे निकष कठोर केल्याचा हा परिणाम असण्याची शक्यता आहे.
दरवर्षी हंडी फोडताना, पडणाऱ्या थरातील गोिवदांना झेलताना, नाचताना, ट्रकवर चढून जाताना, वेगाने मोटरसायकल दामटवताना अनेक गोिवदा जखमी होतात. यातील काही गोिवदांना खासगी दवाखान्यात उपचार दिले जातात. पालिका तसेच सरकारी रुग्णालयात दाखल होत असलेल्या गोिवदांची नोंद होते.
२०१३मध्ये असे सुमारे २४६ गोिवदा सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यातील ६६ जण गंभीर जखमी होते. त्यावर्षी मोटरसायकलवरून जात असलेल्या संकेत मोहिते या १९ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही २३४ गोिवदांना सरकारी रुग्णालयात उपचार मिळाले होते. मात्र त्यातील २६ गोिवदांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयात राहण्याची वेळ आली होती. गेल्या काही वर्षांत गंभीर जखमी होणाऱ्या तसेच उपचारानंतरही कायमस्वरूपी अपंगत्व येणाऱ्या गोिवदांची संख्या वाढत होती. मात्र या वेळी जखमी गोिवदांची संख्या अधिक असूनही त्यात गंभीर जखमी रुग्णांचे प्रमाण नगण्य असल्याचे समोर आले आहे.
या वर्षी जखमी गोिवदांची संख्या ३६४ वर पोहोचली आहे. मात्र त्यातील केवळ ३९ जणांवर दुसऱ्या दिवशी रुग्णालयात राहण्याची वेळ आली आहे. मात्र सर्व गोिवदांची प्रकृती स्थिर आहे. शीव येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून सगळ्यांना पुढील तीन ते चार दिवसात घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयातून देण्यात आली. जखमी गोिवदांची सर्वाधिक संख्या केईएम रुग्णालयात होती. रविवारी सकाळपासून या रुग्णालयात ९७ जखमी गोिवदा दाखल झाले. त्यातील ८८ जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. नऊ जणांना दुसऱ्या दिवशीही रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र प्राथमिक स्वरूपात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे दिसते, असे केईएमचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी सांगितले. ‘दोन दिवसांत तपासण्यांचे अहवाल आल्यावर नेमकी माहिती मिळेल. हंडीची उंची कमी केल्याने या वेळी गोिवदांना गंभीर दुखापती कमी झाल्या आहेत का, ते आता सांगणे कठीण आहे. मात्र गोिवदा कोणत्या थरावरून पडला आहे यापेक्षाही त्याच्या जखमेचे स्वरूप अधिक महत्त्वाचे ठरते,’ असे डॉ. बांगर म्हणाले.
जखमी गोिवदा
* २०१५ – ३६४ जखमी
(३९ दुसऱ्या दिवशीही रुग्णालयात, सर्व गोंिवदांची प्रकृती स्थिर)
* २०१४ – २३४ जखमी
(२६ दुसऱ्या दिवशीही रुग्णालयात, नाचताना हृदयविकाराने राजेंद्र आंबेकर यांचा मृत्यू)
* २०१३ – २४६ जखमी
(६६ दुसऱ्या दिवशीही रुग्णालयात, संकेत मोहिते
(१९ वष्रे) मोटरसायकलवरून घसरून मृत्यू)