News Flash

युकेतील ११ वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन, मुंबईत ५९ वर्षांच्या नराधमाला अटक

युकेमधील ही मुलगी मुंबईत सुट्टीसाठी आली होती

प्रतिनिधीक छायाचित्र

एका ११ वर्षांच्या युकेतील मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ५९ वर्षांच्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. खलीस अहमद सुरज अहमद खान असं या नराधमाचं नाव आहे. तो पी.बी. रोड चर्नी रोड या ठिकाणी वास्तव्यास आहे. यूकेतील एका ११ वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे. युकेमधून ही मुलगी मुंबईत आली होती. तिच्या काकाच्या घरी ती आलेली असताना या मुलीसोबत खलीसने अश्लील वर्तन केले.

पीडित मुलीचे काका ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीच्या शेजारच्याच इमारतीत खलीस खान राहतो. खलीस त्याच्या भावाला भेटण्यासाठी पीडितेचे काका राहतात त्या इमारतीत आला होता. भावाला भेटून जेव्हा खलीस परतत होता तेव्हा त्याने पाहिले की ११ वर्षांची ही मुलगी पायऱ्यांवर बसली आहे. ती एकटी असल्याचा फायदा घेऊन या नराधमाने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. पोलिसांनी ही माहिती दिली.

जेव्हा खलीस खान या मुलीशी अश्लील वर्तन करु लागला तेव्हा या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा खानने तिथून पळ काढला पण त्यानंतर घडला प्रकार या मुलीने तिच्या काकाला सांगितला. त्यानंतर मुलीने केलेल्या वर्णनावरुन या नराधमाला अटक करण्यात आली. POCSO अंतर्गत या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधमाला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे असंही पोलिसांनी सांगितलं. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पोलिसांनी खलिस खानचे पोलीस रेकॉर्ड आहे का? हे तपासले असता त्याने असे प्रकार याआधीही केल्याचं समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:55 pm

Web Title: 59 year old mumbai man arrested for sexually abusing minor uk national scj 81
Next Stories
1 राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल
2 Dahi Handi 2019 : गोविंदांअभावी २०० पथकांची माघार?
3 “राज ठाकरे ईडीच्या चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पूजेला?”
Just Now!
X