मुंबईत गुरुवारी ९१० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ९८८ जण करोनामुक्त झाले. दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून सरासरी रुग्णवाढ ०.८७ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८० दिवसांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत ५ लाख ७४ हजार ९१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २०.७४ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये १२ ते १५ टक्के रुग्ण बाधित आढळत आहेत. सर्वाधिक रुग्ण आढळण्याचे प्रमाण बोरिवली आणि मलबार हिल, नानाचौक या परिसरात आहे.

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या १ लाख २० हजार १६५ वर गेली असून त्यापैकी ९२,६६१ म्हणजेच ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ६,६४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांमध्ये ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या अधिक आहे.