धावत्या लोकलसमोर उडी मारुन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मालाड स्थानकावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १२ जून रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.

सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती स्टेशनवर लोकल येण्याच्या काही क्षण आधी पायऱ्या उतरुन स्थानकावर येताना दिसत आहे. लोकल येताच काही विचार न करता ती व्यक्ती लोकसमोर उडी घेते. लोकल वेगात असल्या कारणाने व्यक्ती लोकलसोबत अक्षरक्ष: फरफटत जाते. 12 जून रोजी सकाळी 8 वाजून 28 मिनिटांनी ही घटना घडली आहे.

[jwplayer HfIJItgy]