06 July 2020

News Flash

अवघ्या वीस हजारात घ्या केजरीवालांसोबत स्नेहभोजनाचा आनंद!

आम आदमी पक्षाचे(आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी पक्षनिधी गोळा करण्याच्या मोहिमेवर आहेत.

| November 27, 2014 04:49 am

आम आदमी पक्षाचे(आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी पक्षनिधी गोळा करण्याच्या मोहिमेवर आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी मुंबईमध्ये केजरीवालांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या स्नेहभोजनसाठी इच्छुकांना वीस हजार रूपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्यावेळीही मुंबई आणि नागपूरमध्ये ‘आप’कडून अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबईनंतर ३० नोव्हेंबर रोजी दिल्लीतही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
केजरीवाल यांनी महाराष्ट्रातून चार कोटींच्या निधी संकलनाचे लक्ष्य समोर ठेवले आहे. तर, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांतून अनुक्रमे तीन आणि दोन कोटी स्नेहभोजनाच्या माध्यमातून जमवण्याचा केजरीवाल यांचा कयास आहे. याशिवाय ‘आप’कडून विविध माध्यामातून पक्षनिधी उभारण्यात येत आहे. यामध्ये मोबाईल अॅप, सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही निधी देण्याचे आवाहन पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. ‘आप’च्या राज्यस्तरावरील समित्यांनाही निधी संकलनासाठी विशिष्ट लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2014 4:49 am

Web Title: aap drying chest kejriwal to host rs 20000 per plate dinner to fund party
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 मंत्रिमंडळ विस्ताराला सोमवारचा मुहूर्त?
2 दक्षिण मुंबईत ‘टाटा’ची पॉवर कायम
3 महापालिकेत भाजप एकाकी
Just Now!
X