News Flash

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, गाडी कटरच्या सहाय्याने कापून चालकाचा मृतदेह काढला बाहेर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळच्‍या सुमारास कारचा भीषण अपघात झाला आहे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, गाडी कटरच्या सहाय्याने कापून चालकाचा मृतदेह काढला बाहेर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळच्‍या सुमारास कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात कारचालक जागीच मृत्यू झाला आहे. खोपोलीजवळ बोरघाट उतरताना ढेकू गावाजवळ मुंबईकडे जाणारी कार पुढच्‍या वाहनाला धडकून हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारच्‍या समोरच्‍या बाजूचा चक्‍काचूर झाला आहे. अपघातानंतर मृत वाहनचालक गाडीत अडकून पडला होता. गाडी कटरच्‍या सहाय्याने कापून चालकाला बाहेर काढण्‍यात आले. अपघाताचा महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परीणाम झाला नाही.

खोपोली हदीतील बोरघाट उतरताना खोपोली एक्झिट व खालापुर टोलनक्याच्या मध्ये असताना कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा मृतदेह स्टेअरिंगमध्ये अडकला होता. गाडी कटरच्‍या सहाय्याने कापून चालकाला बाहेर काढण्‍यात आले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 8:54 am

Web Title: accident on mumbai pune expressway sgy 87 2
Next Stories
1 तळेगावजवळ सहलीच्या एसटी बसला अपघात
2 ‘मिस यू’ क्षणांसाठीही केक घेण्याचा वाढता कल
3 सामान्यांना ऑनलाइन गंडा
Just Now!
X