16 January 2018

News Flash

अभिनेता सुनिल शेट्टीच्या भावाची दबंगगिरी

अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी याची दबंगगिरी शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. क्षुल्लक वादातून अजय शेट्टी

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 5, 2014 2:57 AM

अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी याची दबंगगिरी शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. क्षुल्लक वादातून अजय शेट्टी आणि त्याच्या चालकाने ‘बेस्ट’ बसच्या चालकाला बेदम मारहाण केली. शनिवारी दुपारी लोअर परळ येथील अंबिका मिलसमोर ही घटना घडली. पोलिसांनी चालकाला अटक
केली आहे.
दुपारी पाऊणच्या सुमारास ‘बेस्ट’ बसने मर्सिडीज गाडीला धडक दिली. या गाडीत अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी होता. त्याने तसेच मर्सिडीजचा चालक श्यामनारायण मिश्रा या दोघांनी ‘बेस्ट’ बसचा चालक राजकुमार शिंदे (३६) याला बेदम मारहाण केली. शिंदे यांच्यावर नंतर नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चालक मिश्रा याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांनी दिली.

First Published on January 5, 2014 2:57 am

Web Title: actor sunil shettys dabang brother beats best driver
  1. No Comments.