23 January 2020

News Flash

अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून चार वर्ष केला बलात्कार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे

मुंबईतील एका अभिनेत्रीने आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून चार वर्ष बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने एका ब्युटी क्लिनिकच्या संचालकावर हे आरोप केले आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या या महिलेने चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी चार वर्षांपुर्वी भेट झाली होती अशी माहिती पोलिसांना दिली आहे. महिलेने पोलीस तक्रारीत आपण अभिनेत्री असल्याचं सांगितलं आहे.

पीडित महिलेनुसार, ब्युटी क्लिनिकच्या संचालकाने आपल्याला भोपाळमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर दोघे भोपाळमध्ये गेले होते. तिथे हॉटेलमध्ये आरोपीने पीडित महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने पीडित महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं. अशाप्रकारे आरोपीने २०१४ ते २०१८ दरम्यान महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले. पण आता लग्न करण्यास तो नकार देत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला असून प्रकरण भोपाळच्या एमपी नगर पोलीस ठाण्याकडे सोपवलं आहे. दरम्यान भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून केस डायरी मिळाली असून पोलिसांचं एक पथक लवकरच मुंबईला पाठवलं जाईल. तिथे पीडितेचा जबाब घेऊन प्रकरणाचा तपास केला जाईल.

गेल्या आठवड्यात मुंबईतील अजून एका अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. रिपोर्टनुसार, २६ वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीची एका शूटदरम्यान ३४ वर्षीय मॉडेल-अभिनेत्याशी भेट झाली होती. आरोपी नोएडाचा रहिवासी असून कामानिमित्त मुंबईत ये-जा करत असतो. आरोपीने लग्नाचं आश्वासन देत जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित अभिनेत्रीने केला होता.

First Published on July 22, 2019 6:42 pm

Web Title: actress filed complaint of rape on the name of marriage mumbai police sgy 87
Next Stories
1 मुंबई: एमटीएनएलच्या इमारतीला आग, ६० पेक्षा अधिक जण सुखरुप बाहेर
2 डोंबिवलीतल्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू
3 सरकारने देशाची प्रतिष्ठा उंचावली!
Just Now!
X