21 September 2020

News Flash

एअर इंडियाच्या विमानाची एअरोब्रिजला धडक

मुंबईहून रियादला जात असलेले हे विमान उड्डाणापूर्वीच एअरोब्रिजला धडकले.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानाची एअरोब्रिजला धडक बसल्याची घटना आज सायंकाळी घडली. मुंबईहून रियादला जात असलेले हे विमान उड्डाणापूर्वीच एअरोब्रिजला धडकले. या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी हानी टळल्याचे अधिका-यांनी सांगितले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमान पार्क करताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूला असलेल्या इंजिनला साधारण नुकसान झाल्याचे कळते. दरम्यान, या विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. तसेच, या अपघातामुळे विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम न झाल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
air-india3

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 9:18 pm

Web Title: air india flight hits aerobridge takeoff aborted
Next Stories
1 Sheena bora murder case: इंद्राणीनेच शीनाचा गळा दाबला, श्यामवर रायची लेखी साक्ष
2 चांगल्या कामासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य
3 मुंबईत मुसळधार, रस्ते वाहतुकीसोबतच लोकलही खोळंबली
Just Now!
X