News Flash

ऐरोलीमध्ये इमारत ढासळली

ऐरोली, सेक्टर एकमधील शिव कॉलनीमध्ये इमारतीचा पाया खोदत असताना बाजूला असणारी जुनी इमारत ढासळली.

| June 1, 2015 12:50 pm

ऐरोली, सेक्टर एकमधील शिव कॉलनीमध्ये इमारतीचा पाया खोदत असताना बाजूला असणारी जुनी इमारत ढासळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याच इमारतीत राहणाऱ्या दोन भाडेकरूंनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने सर्वाचे प्राण वाचले. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ढासळलेल्या दुमजली इमारतीतील भाडेकरूंना केवळ १५ दिवस अगोदर इमारत सोडण्याचे तोंडी आदेश रूम मालकाने दिले होते. जेसीबीने पाया खोदत असताना अचानक शेजारीत इमारतीच्या भिंती खूप जोरात हादरू लागल्याने प्रसंगावधान राखून दोन्ही खोल्यांतील भाडेकरू अंगावरील कपडय़ांनिशी लहान मुलांना कडेवर घेत जीव मुठीत धरून पळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:50 pm

Web Title: airoli building collapse
Next Stories
1 सावरकरांच्या काव्यपंक्ती आता पुन्हा अंदमानमध्ये
2 रविवार, आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
3 मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
Just Now!
X