बोलाविण्याऐवजी प्रश्नावली पाठविण्याच्या पद्धतीवर आम आदमी पार्टीने आक्षेप घेतला आहे. करोडो रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेल्या अजित पवार यांना भाजपकडून खास संरक्षण देण्यात आल्याचा आरोपही आपने केला आहे.
‘आप’च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी पत्रकात हा चौकशीचा फार्स असल्याची टीका केली आहे.
दरम्यान १५ दिवसांपूर्वी अजित पवार यांना प्रश्नावली पाठविली होती. त्याबाबत ते माहिती घेत आहेत. त्यावर ते त्यांचे सविस्तर म्हणणे मांडतील. ही पद्धत नवी नाही. या प्रकरणी आमचा तपास सुरूच आहे. उत्तर मिळाल्यानंतर आवश्यकता भासेल तर पुढची प्रक्रिया केली जाईल असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रविण दीक्षित यांनी स्पष्ट केले.
भुजबळ ‘एसीबी’त!
महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री छगन भुजबळ हे गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आले होते. त्यांनी काही मुद्दय़ांबाबत स्पष्टीकरण सादर केले. भुजबळ यांना याआधी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यांनी  जबाब नोंदविला आहे. आणखी काही मुद्दय़ांबाबत स्पष्टीकरण हवे असल्यामुळे भुजबळ पुन्हा एसीबी कार्यालयात आले होते.