News Flash

अंबरनाथ, बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष

अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये स्वतंत्रपणे लढून स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या शिवसेनेला भाजपने विकासाच्या मुद्दय़ांवर बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा

| May 17, 2015 04:09 am

अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये स्वतंत्रपणे लढून स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या शिवसेनेला भाजपने विकासाच्या मुद्दय़ांवर बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी याबाबतची घोषणा होईल.  अंबरनाथमध्ये प्रज्ञा बनसोडे तर बदलापूरमध्ये वामन म्हात्रे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेनेचे २५ नगरसेवक आहेत. सात अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने बहुमताचे गणित सेनेच्या बाजूने होते. मात्र अपक्ष हिराबाई जावीर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. बदलापूरमध्ये भाजपच्या संजय भोईर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. मात्र या दोघांनीही अर्ज मागे घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 4:09 am

Web Title: ambarnath badlapur mayor shiv sena
Next Stories
1 वसई-विरार पालिकेची १४ जूनला निवडणूक
2 वातानुकूलित बसमध्ये लहान मुलांना अर्धे तिकीट?
3 काळबादेवीतील इमारतींवर कारवाई
Just Now!
X